जेएनपीए-एसईझेड गुंतवणूकदार कॉन्क्लेव्ह 2022
उरण : जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (जेएनपीए) हे भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणारे बंदर असून जेएनपीएने 27 मे 2022 रोजी मुंबईत भारतीय उद्योग महासंघ (CII) च्या सहकार्याने 'जेएनपीए-एसईझेड इन्व्हेस्टर कॉन्क्लेव्ह 2022' चे आयोजन केले होते. गुंतवणूकदारांना भविष्यातील विकासामध्ये गुंतवणुक करण्यासाठी व देशाच्या वाढत्या बंदर-उद्योग आधारित अर्थव्यवस्थेचा एक भाग होण्यासाठी गुंतवणूकदारांना भरपूर संधी उपलब्ध देण्याच्या उद्देशाने या कॉन्क्लेव्होचे आयोजन करण्यात आले होते.
बंदर आधारित औद्योगिकीकरणाच्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने, जेएनपीएने हा बहु-उत्पादन विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्प 277.38 हेक्टर फ्रीहोल्ड जमिनीवर विकसित केला आहे. अशाप्रकारचे हे औद्योगिक केंद्र भारतातील पहिले बंदर-आधारित बहु-उत्पादन कार्यरत विशेष आर्थिक क्षेत्र (एसईझेड) आहे.
या विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये उपलब्ध असलेल्या गुंतवणूकीच्या विविध संधी व जागतिक दर्जाची वैशिष्ट्ये अधोरेखित करताना जेएनपीएचे अध्यक्ष श्री संजय सेठी, भा.प्र.से. म्हणाले, “जेएनपीए एसईझेडच्या या विशिष्ट प्रकल्पासह बंदर-आधारित व्यवसाया वाढीच्या पैलूंना अधिक बळकट करण्यासाठी सज्ज आहे. या एसईझेड मध्ये सिंगल-विंडो क्लिअरन्स, मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटी आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधां उपलब्ध आहेत; भारतामध्ये व्यवसाय स्थापन करण्यासाठी आणि निर्यात-केंद्रित उद्योगांना चालना देण्यासाठी हा एक आदर्श पर्याय आहे. जेएनपीएच्या वतीने, मी सर्व संभाव्य गुंतवणूकदारांना या प्रकल्पाचा भाग होण्यासाठी आणि भविष्यातील विकासामध्ये गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित करतो.
अतिरिक्त आर्थिक क्रियाकलाप निर्माण करणे निर्यात व गुंतवणुकीला चालना, रोजगार निर्मिती आणि पायाभूत सुविधांचा विकास हे जेएनपीए सेझची उद्दिष्टे आहेत. जेएनपीए-एसईझेड गुंतवणूकदारांना गुंतवणूकीसाठी विशेष प्रोत्साहन देत आहे, जसे की आर्थिक कायदे जे देशाच्या इतर सामान्य आर्थिक नियमांपेक्षा अधिक उदार आहेत आणि पाणी आणि वीज पुरवठ्यासाठी अनुदानित दर आहेत. जेएनपीए-एसईझेड साठी विविध पायाभूत सुविधां विकासित करण्यात आल्या आहेत ज्यामध्ये रस्ते, वीज, पाणी, स्ट्रॉम वॉटर ड्रेन, सांडपाणी संकलन व उपचार आणि घनकचरा विल्हेवाट सारख्या सर्व मूलभूत पायाभूत सुविधांचा समावेश आहे. एसईझेडच्या सर्व भूखंडाना रस्ते, पाणी, वीज आणि सांडपाण्याची लाईन यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जेएनपीए-एसईझेड मधील भूखंड वाटपासाठी ई-निविदा सह ई-लिलाव प्रक्रिया राबविण्यात येते, ज्यामुळे निविदा प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आणि पारदर्शक होते.