नवी मुंबईत आणखी दोन इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू होणार
नवी मुंबई :नवी मुंबई महागरपालिकेच्या इंग्रजी माध्यातील शाळांना वर्षागणिक प्रतिसाद वाढत चालला असल्याने यंदा महापालिेकेच्यावतीने शहरात आणखी दोन नवीन शाळा सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरातील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षणाची सोय होणार आहे.
एम एम आर डी ए क्षेतात्र महापालिका शाळांचा पट घटत चालला असताना नवी मुंबई शहरात मनपाच्या वतीने चांगले शिक्षण देत असल्याने पटसंख्येत वाढ होत आहे.त्यातच मनपाने सीबीएसच्या धर्तीवर शाळा सुरू कराव्या म्हणून लोकप्रतिनिधीनी मागणी केली होती.त्यानुसार महापालिकेने कोपरखैरणे व सिवूड मध्ये इंग्रजी माध्यामाच्या शाळा सुरू केल्या.त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करणारी राज्यातील पहिली महापालिका म्हणून नवी मुंबई महाल ठरली. शाळा सुरू होताच या शाळांना प्रचंड प्रतिसाद लाभला असून दरवर्षी हजारो अर्ज येत आहेत.तर यंदा नर्सरी प्रवेशासाठी तब्बल १२०० अर्ज आले असून त्यातील ४० अर्ज अजून प्रतिक्षा यादीत आहेत.मात्र शाळेच्या एक किलोमीटर परिसरातील विद्यार्थ्याना प्रथम प्राधान्य दिले जाते. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित रहावे लागते.आणि हा प्रतीसाद पाहता शहरात इतर भागात ही इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करण्यावर मनपाने प्राधान्य दिले आहे. त्यामुळे यंदा वाशी सेक्टर १४ व कोपरखैरणे सेक्टर १ मध्ये १ ली ते १० वी पर्यंत आणखी दोन शाळा सुरू होणार असून त्यासाठी लवकरच शिक्षक भरती केली जाणार आहे.तर यंदा याठीकाणी नर्सरी चे प्रवेश केले जाणार आहेत.अशी माहिती मनपा शिक्षण विभगामार्फत देण्यात आली आहे.
तूर्भेत थेट पहिली ते चौथी पर्यंत इंगजी माध्यमाची शाळा
एकीकडे नवी मुंबई महागरपालिका मराठी आणि इंग्रजी माधयमातून मोफत शिक्षण देत असताना शहरात अनधिकृत शाळा देखील सुरू आहेत.आणि तुर्भे स्टोर मधील अशाच एका अनधिकृत शाळेवर मनपाने नुकतीच कारवाई केली आहे.मात्र कारवाई नंतर या भागातील इंग्रजी माध्यातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाची गैरसोय होऊ नये म्हणून तुर्भे स्टोर मध्ये असलेल्या मनपाच्या वास्तूत इयत्ता पहिली ते चौथी अशी इंग्रजी माध्यमाची शाळा मनापाच्या वतीने जून मध्ये सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
नवी मुंबईत सी बी एस ई शाळांना येणारे प्रवेश अर्ज पाहता असलेल्या दोन शाळा अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे यंदा वाशी सेक्टर १४ आणि कोपरखैरणे सेक्टर १ मध्ये दोन सी ई एस सी शाळा सुरू करण्यात येणार आहेत.तर तुर्भे स्तोर येथे पहिली ते चौथी अशी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यात येणार आहे.
जयदीप पवार,
शिक्षण अधिकारी, नवी मुंबई महनगरपालिका.