खारघरमध्ये राहणा-या नायझेरिअन नागरिकांची माहिती उपलब्ध करून द्या - बीजेपी
खारघर: खारघर परिसरात किती नायझेरियन नागरिक वास्तव्य करीत आहे. भाड्याने राहत असल्यास भाडे करार पत्र आणि तसेच ते कोणता व्यवसाय करतात याची माहिती देण्यात यावी अश्या मागणीचे निवेदन भाजपच्या शिष्टमंडळाने खारघर पोलिसांना दिले आहे. या शिष्टमंडळात नगरसेवक रामजीं बेरा, शत्रुघ्न काकडे, भाजपचे शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, शहर चिटणीस दीपक शिंदे, कीर्ती नवघरे, अमर उपाध्याय आणि काही भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.