खारघर मध्ये सिडकोकडून पाणथळ जागेत भराव - पर्यावरण प्रेमी नाराज

खारघर:  खारघर मधील कुटुक बांधण आणि स्वप्नपूर्ती गृहनिर्माण सोसायटी लगत असलेल्या पाणथळ जागेवर  सिडकोकडून मातीचा भराव टाकण्याचे काम वेगाने सुरू आहे. सिडकोकडून पाणथळ जागा नष्ट  केली जात असल्यामूळे पर्यावरण प्रेमी मध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. 

   खारघर सेक्टर दहा मधील खाडी किनारा लगत मागील आठवड्यात डेब्रिज टाकून भराव करीत असल्याचे तर सेक्टर अठरा संजीवन शाळे समोरील खाडी किनाऱ्यालगत एका बिल्डर कडून इमारती बांधकामासाठी खोदकाम करताना बाहेर पडलेली माती डंपर लावून खाडी किनाऱ्यावर टाकून भराव करीत असल्याची माहिती पर्यावरण प्रेमींना मिळाल्यावर पालिका प्रभाग अधिकाऱ्याकडे तक्रार केल्यावर पालिकेने सदर काम थांबविले ,मात्र सदर जागा सिडकोची आहे. त्यामुळे सिडकोने पाहणी करून योग्य ती कारवाई करावी असे पालिका अधिकाऱ्याने सांगिलते. मात्र सिडकोचे अधिकारी ढुंकूनही पाहत नाही. दरम्यान बुधवार पासून खारघर सेक्टर छत्तीस  कुटुक बांधण गाव आणि स्वप्नपूर्ती गृहनिर्माण सोसायटी लगत  असलेल्या  पाणथळ जागेवर  सिडकोकडून मातीचा भराव केला जात आहे.काही  पर्यावरण मोठ्या विरोध केल्यामुळे सिडकोने तात्पुरत्या स्वरूपात काम थांबविल्याचे  एका पर्यावरण प्रेमाने सांगितले. शासनाने राज्यात कोणत्या ठिकाणी पाणथळ जागा आहे. याचा नकाशा तयार केला आहे. सदर नकाशात खारघर मधील सदर जागा पाणथळ असल्याचे नमूद करून देखील  सिडकोकडून मातीचा भराव केला जात असल्यामुळे पर्यावरण प्रेमी मध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. 
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सायन्स पार्कची वैशिष्ट्यपूर्णता नजरेसमोर ठेवून कार्यवाहीचे आयुक्त यांचे निर्देश