खारघरमध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन
खारघर : युवा प्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून खारघर मध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पार पडले. रक्तदान शिबिरात एकत्र होणारा रक्तसाठा खारघर मधील कॅन्सर रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या रुग्णांना उपलब्ध करून देणार असल्याची बाब ठाकूर यांच्या निदर्शनास येताच त्यांनी किरण पाटील यांचे कौतूक केले. यावेळी नगरसेविका नेत्रा पाटील तसेच भाजपचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. विशेषतः यावेळी काही दिव्यांग व्यक्तीने रक्तदान करून सहभाग नोंदवीला.