देशातील छोट्या मोठ्या सामाजिक संघटना एकत्र आल्यास राष्ट्रीय ताकद निर्माण होते
नवी मुंबई: एकता हीच शक्ती आहे. एकता असेल तर एक ताकद निर्माण होते. अखिल भारतीय आदिवासी, कश्यप, कहार, निषाद, भोई व कोळी समन्वय समीतीच्या माध्यमाने आपण याच प्रवाहकडे जात आहोत. तसेच राष्ट्रीय संघटन होत नसेल तो पर्यंत काहीही योग्य साधत नाही. म्हणून आपल्याला एकत्र येण्याची गरज आहे आणि एकत्र आल्या शिवाय काहीही साध्य होणार नाही. म्हणून देशातील छोट्या मोठ्या सामाजिक संघटनानी एकत्र आल्यास सामाजिक हित साध्य होऊन राष्ट्रीय ताकद निर्माण होते असे प्रतिपादन गुजरात सरकार मधील कॅबिनेट मंत्री कुवरजी भाई बवारींया यांनी ऐरोली येथे केले.
कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेश पाटील व विधीज्ञ चेतन पाटील यांच्या माध्यमातून ऐरोली येथील ऐरोली स्पोर्ट्स क्लब येथे देशामधील २९ राज्यातील अखिल भारतीय आदिवासी कश्यप, कहार, निषाद, भोई, कोळी समन्वय समितीच्या माध्यमाने समाजाच्या समस्या सोडविण्याच्या हेतूने २१ व २२ मे रोजी दोन दिवसीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गुजरात सरकार मंत्री कुवरजी भाई बवारीया प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार रमेश पाटील, विधीज्ञ चेतन पाटील, अखिल भारतीय आदिवसी समन्वय समिती, कोळी महासंघ, अखिल भारतीय कोळी संघ तसेच इतर समन्वय समिती अंतर्गत असलेल्या संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच या अधिवेशनात देशातील १५१ संघटना सामील झाल्या होत्या.
मंत्री बवारीया पुढे म्हणाले की, या तेराव्या आधिवेशनाची जबाबदारी आमदार रमेश पाटील व विधीज्ञ चेतन पाटील यांनी घेतली व लीलया पार पाडली. त्यांनी आपल्याला एकत्र आणण्याची भूमिका चोख पाडली. त्यामुळे त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहेत असेही पुढे ते म्हणाले. तसेच एकत्रित आलो तरच कोणताही राजकीय पक्ष आपल्याला जवळ करतो नाहीतर अशक्य आहे असेही पुढे ते म्हणाले.
या अधिवेशनात वंचित असलेल्या जातीतील एकूण नऊ प्रस्ताव मंजूर करण्यात आले. हे सर्व प्रस्ताव देशातील लोकसभा, राज्यसभा खासदार, मंत्री, पंतप्रधान यांना पाठविले जातील. तसेच त्या प्रस्तांवाच्या माध्यमाने लिखित समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील असे समन्वय समितीचे राष्ट्रीय आयोजक राजाराम कश्यप यांनी सांगितले.
यावेळी अध्यक्षीय भाषणात आमदार रमेश पाटील यांनी उपस्थितांना सांगितले की, अधिवेशनात खूप समस्यांवर चर्चा झाली. त्यामध्ये आमच्या मच्छीमार बांधवाचे प्रश्न देखील सामील करून घेतले. याबद्दल समन्वय समितीचे आभारी आहे. तसेच जे प्रस्ताव मंजूर केले आहेत. ते पंतप्रधानाकडे पाठवले जातील असे शेवटी सांगितले.