शिवसंपर्क अभियानाचा दुसरा टप्पा पनवेल मध्ये मोठ्या उत्साहात सुरुवात - राजन विचारे,

पनवेल पनवेल तालुक्यातील अजीवली गावात आदिवासी मेळावा संपर्क अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबन दादा पाटीलआमदार महेंद्र थोरवेजिल्हाप्रमुख शिरीष घरतउपजिल्हाप्रमुख रामदास पाटीलतालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेलविधानसभा संघटक दीपक निकमतालुका संघटक भरत पाटीलमहानगर समन्वयक दीपक घरतपनवेल ग्रामीण तालुका प्रमुख ज्ञानेश्वर बडेएकनाथ म्हात्रे, उपशहर प्रमुख नवीन पनवेल ज्ञानेश्वर भंडारीकरमाळे विधानसभा संपर्क प्रमुख बापूसाहेब मोरे व शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या शिवसंपर्क अभियानात आदिवासी पाड्यात आयोजित केलेल्या सभेत आदिवासी बांधवांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत सखोल चर्चा करण्यात आली. अंत्योदय योजनासंजय गांधी निराधार योजना अशा अनेक प्रकारच्या योजनांमध्ये येणाऱ्या अडचणी बद्दल चर्चा करण्यात आली.

यावेळी उपस्थित आदिवासी बांधवांना भविष्यात कोणत्याही प्रकाराची अडचण निर्माण होणार नाही असे आश्वासित केले. तसेच अंत्योदय योजनेअंतर्गत आदिवासी महिलांना रेशन कार्ड चे वाटप देखिल करण्यात आले.

खांदा कॉलनी येथे आयोजित केलेल्या शिवसंपर्क अभियानात शिक्षकडॉक्टरवकील व व्यापारी त्यांच्या समस्यांचे निरासन होणार -खासदार राजन विचारे यांचा पुढाकार

पनवेल शिवसंपर्क अभियानाची सभा पनवेल खांदा कॉलनी येथील बेल्लेझा बँक्वेट हॉल येथे पार पडली. या पनवेल मधील सभेला मोठ्या प्रमाणात व्यापारीवकीलडॉक्टरशिक्षक व रेल्वे संघटनांच्या प्रतिनिधीनी मोठ्या संख्येने उपस्थिती दिली होती. या सर्वांनी महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा करून आपल्या समस्या खासदार राजन विचारे यांच्याकडे मांडल्या प्रश्नोत्तराच्या या सभेत नागरीकांच्या जास्तीत जास्त समस्या निवारण्याचा प्रयत्न खासदार राजन विचारे यांच्याकडून करण्यात आल्या. उर्वरित समस्यांबाबत संबधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा बैठक करण्यात येईल असे आश्वासित केले.

तसेच कोविडच्या संकट काळात उत्कृष्ट काम केलेले सन्माननीय डॉक्टरपरिचारिकास्वच्छ्ता दुतस्मशान भूमीतील कर्माचारी अशा अनेकांचा यावेळी "कोविड योद्धा सन्मान पुरस्कार" देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबन दादा पाटीलआमदार महेंद्र थोरवेरायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरतउपजिल्हाप्रमुख रामदास पाटीलतालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेलतालुका प्रमुख एकनाथ म्हात्रेविधानसभा संघटक दीपक निकमतालुका संघटक भरत पाटीलखांदा कॉलनी शहर प्रमुख सदानंद शिर्केनविन पनवेल शहर प्रमुख यतीन देशमुखपनवेल शहर प्रमुख प्रवीण जाधवमहानगर समन्वयक दीपक घरत व इतर शिवसेना व युवासेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

खेडोपाड्यातभेटी व विकासकामांचे भूमिपूजन

Ø कोळवाडी येथे स्थानिक ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते.

Ø कोळवाडी गाव येथे स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.

Ø ववंजे गावातील गोंडावा स्टॉप येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन व कार्यकर्ता संपर्क अभियान आयोजित केला होता.

Ø ववंजे गावातील साकव येथे पाणपोईचे उदघाटन करण्यात आले.

Ø तळोजा शहरात घोटगाव येथे शिवसेना शाखेचे उदघाटन करण्यात आले.

Ø कळंबोली रोडपाली येथे आयोजित करण्यात आलेल्या जेष्ठ नागरिक सत्काराला भेट दिली.

Ø कामोठे शहरात आयोजित करण्यात आलेल्या महिला अधिकारी  संपर्क मेळावा येथे भेट दिली.

Ø खारघर येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवसेना कार्यकर्ता मेळावा येथे भेट दिली.

Ø गरीब व गरजू नागरिकांना स्वयंरोजगाराच्या दृष्टीकोनातून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून “फिरते विक्री केंद्र” उपलब्ध करून दिले त्याचे उद्घाटन करताना.

Ø श्रीपुष्प प्रतिष्ठान फाउंडेशन तर्फे पनवेलकर नागरिकांना मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मोरा ते भाऊचा धक्का जलप्रवास महागणार