माणेक नगर सोसायटीचा पाण्याचा प्रश्न सुटला. 

पनवेल : कार्यतत्पर शेकाप. नगरसेविका डॉ सुरेखा विलास मोहोकर यांच्या सततच्या पाठपुराव्याने माणेक नगर सोसायटीचा पाण्याचा प्रश्न सुटला.

           प्र. क्र.१८ मधील माणेक नगर सोसायटीला अपुरा पाणीपुरवठा होत होता. नगरसेविका डॉ. मोहोकार यांना याची तक्रार येताच सोसायटीचे सभासद  व पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी अविनाश पाटील यांच्यासमवेत पाहणी करून घेतली असता पाण्याचा पुरवठा करणारे पाइप व वाँल्हव नादुरुस्त आणि खराब होऊन फुटल्याचे  निर्दशनास आले. यावर ताबडतोब नव्याने पाइप टाकून देण्याचे काम सुरू करून घेण्यात आले. २३ मे ला हे काम पूर्ण करण्यात आले.याबद्दल सोसायटीच्या सदस्यांनी नगरसेविका डॉ  सुरेखा मोहोकर यांचे व पनवेल महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्या सर्व कर्मचारी वर्गाचे आभार मानले. यासाठी माणेक नगर सोसायटीचे केतन शाह, वैशाली शाह, कोळी व महिलावर्ग उपस्थित होता.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

शिवसंपर्क अभियानाचा दुसरा टप्पा पनवेल मध्ये मोठ्या उत्साहात सुरुवात - राजन विचारे,