लीना गरड यांचा मालमत्ता कर लोकसहभागातून भरणार

खारघर :  पनवेल महानगर पालिकेने नगरसेविका  लीना गरड यांना मालमत्ता कर भरण्यासाठी विशेष नोटीस बजावल्यानंतर खारघर  कॉलनी मधील रहिवासी एकत्र  लोकसहभागातून मालमत्ता कर भरण्याचा ठराव पारित केला. यावेळी खारघर, कामोठे, कळंबोली मधून विविध सामाजिक संघटना, सोसायटी मधील पदाधिकारी उपस्थित होते.

निवडणुकीत निवडणूक लावणाऱ्या उमेदवारांना संपूर्ण मालमत्ता कर भरल्या शिवाय निवडणूक लढविता येत नाही.त्यात नगरसेविका लीना गरड ह्या विद्यमान असल्यामुळे 31 मे पूर्वी मालमत्ता कर भरणे आवश्यक आहे. दरम्यान पालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या सहीने गरड ह्यास फेब्रुवारी महिन्यात नोटीस पाठवून विहित मुदतीत मालमत्ता कर भरणा करून पावती  सचिव विभागाकडे सादर करण्यात यावे अश्या प्रकारची नोटीस दिली होती, दरम्यान लीना गरड यांनी दुहेरी मालमत्ता कराच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच दुहेरी मालमत्ता करांचा भरणा करणार नाही असा ठाम निर्धार केला होता.   पनवेल महानगरपालिकेच्या मालमत्ता कराचा तिढा दोन वर्षांपासून सुरू आहे. लीना गरड यांनी  सत्ताधाऱ्यांनी लावलेल्या बेकायदेशीर मालमत्ता कर प्रणाली विरोधात सातत्याने बैठका, उपोषण, रॅली , रथ, सोसायटी बॅनर च्या माध्यमातून मोठा लढा उभारला. त्या लढ्याला नागररिकांनी भरघोस प्रतिसाद दिला. त्यामुळेच सिडको कॉलनी परिसरातील अजूनही मोठ्या प्रमाणात   मालमत्ता धारकांनी  मालमत्ता कर भरलेला नाही.दरम्यान  गरड यांनी 31 मे पूर्वी मालमत्ता कर न भरल्यास येणारी निवडणूक लढविता येणार नसल्याची माहिती कॉलनी मधील काही राहिवासीयांना समजल्यावर बैठक घेवून लीना गरड यांचा मालमत्ता कर लोकसहभागातून भरण्याचा ठराव पारित केला.

कॉलनी वासीयांनी एकमताने पारित केला ठराव मंजूर करून लीना गरड यांनी जनतेसाठी लढत रहावे, यासाठी आलेल्या नागरिकांनी, आपल्या सोसायटी मधील प्रत्येक घरातून , स्वेच्छेने 1 रुपया पासून ते 10 रुपया पर्यन्त लोक वर्गणी करून मालमत्ता कर लोकसहभागातून  31 मे पूर्वी  मालमत्ता कर भरण्याचा ठराव पारित केला. या बैठकीला कॉलनी मधील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

कोट - मालमत्ता म्हणून 55 हजार 996 भरणा करण्याची नोटीस पालिकेकडून फेब्रुवारी महिन्यात प्राप्त झाली होती. पालिकेने लावलेल्या दुहेरी मालमत्ता कराच्या विरोधात आवाज उठविल्यामुळे   सत्ताधाऱ्यांने  राजकीय आयुष्यातून उठवण्याच्या उद्देशाने, सत्ताधारी यांनी प्रशासनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून, लीना  कोंडीत पकडण्याचा कुटील डाव रचला होता. मात्र खारघर, कामोठे, कळंबोली, तळोजा  आदी कॉलनी मधील राहिवासीयांनी जनतेच्या हितासाठी आवाज उठविण्यासाठी गरज असल्याचे सांगून लोकसहभागातून मालमत्ता कर भरणाचा संकल्प केला आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आडिवली-भुतवलीतील आदिवासींच्या घरांचे स्वप्न पूर्ण;  गणेश नाईक यांच्या हस्ते वितरण