उरण व कर्जत टप्पा 2 मधील शिवसंपर्क अभियानाला सुरुवात - खासदार राजन विचारे
उरण - महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेब यांच्या आदेशाने शिवसंपर्क अभियानाला संपूर्ण महाराष्ट्रभर सुरूवात करण्यात आलेली आहे. त्यापैकी पहिला टप्पा गोंदिया येथे संपन्न होऊन शिवसंपर्क अभियान टप्पा -२ शिवसंपर्क अभियान प्रमुख खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच उरण व कर्जत विधानसभा मतदार संघापासून अभियानास सुरुवात करण्यात आलेली आहे.
उलवे येथून बाईक रॅली गव्हाण, कोपर, जासई, चिरनेर, येथे रवाना झाली. तेथे महागणपतीचे दर्शन करून उरण येथील शहरांमध्ये रॅलीने प्रवेश करून यु एस शाळेच्या सभागृहात जाहीर सभा घेण्यात आली.
त्यावेळी उरण विधानसभा मतदारसंघात पक्ष संघटनात्मक बांधणी आणि शिवसेना पक्षाचे बळकटीकरण करण्यासंदर्भात चर्चा करीत मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना उरण विधासभा मतदार संघातील शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. राज्यभरात किंबहुना संपूर्ण देशात कोणतेही संकट आले असता शिवसेनेचा शिवसैनिक नेहमी मदत करण्यासाठी अग्रस्थानी असतो ही बाब आपल्या सर्वांसाठी अभिमानाची आहे, गेल्या दोन वर्षात खऱ्या अर्थाने आरोग्य व्यवस्था बळकट करण्याचे काम महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झाले आहे अशी भावना यावेळी बोलताना व्यक्त केली.
त्यावेळी रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील, महिला जिल्हा संपर्कप्रमुख किशोरीताई पेडणेकर, मा. आमदार व जिल्हाप्रमुख मनोहर भोईर, पनवेल जिल्हाप्रमुख शिरीष घरत उपजिल्हाप्रमुख नरेश रहाटकर, विधानसभा संपर्क प्रमुख महादेव घरत, मा. जिल्हाप्रमुख दिनेश पाटील, उरण तालुका प्रमुख संतोष ठाकूर, तालुका प्रमुख रघुनाथ पाटील, उरण तालुका संघटक बी. एन. डाकी, उपजिल्हा महीला संघटक ममता पाटील व तालुका संघटक भावना म्हात्रे व आदी मान्यवर उपस्थित होते.