खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नाने ऐरोली धर्मवीर आनंद दिघे मैदान व सानपाडा येथे झाशीची राणी मैदानाचे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
नवी मुंबई - नवी मुंबईतील सेक्टर -३, ऐरोली येथील धर्मवीर आनंद दिघे साहेब मैदान तसेच घणसोली विभागातील सेक्टर – ९ येथील संत निरंकारी चौक सुशोभीकरण करणे त्याचबरोबर सानपाडा येथील भूखंड क्र.३, सेक्टर -७ येथील झाशीची राणी मैदान विकसित करण्यासाठी खासदार विचारे नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे सतत पाठपुरावा करीत होते. सेक्टर -३, ऐरोली येथील मैदानाला धर्मवीर आनंद दिघे साहेब मैदान असे नामकरण 2003 मध्ये करण्यात आले होते. परंतु संपूर्ण मोकळे मैदान असल्याने याचा योग्य तसा वापर होत नव्हता. खासदार राजन विचारे यांच्या हि बाब लक्षात येता त्यांनी नवी मुंबई महानगरपालिकेकडे पाठपुरावा करून त्याचे काम सुरू केले. या मैदानात अत्याधुनिक सुविधा खेळाडू प्रेमींना मिळण्यासाठी त्यांनी या मैदानाचा नियोजित आराखडा तयार करून घेतला. त्यामध्ये सेक्टर -३ येथील धर्मवीर आनंद दिघे साहेब मैदानात बॅडमींटन, टेनिस कोर्ट, क्रिकेट पीच, व्हॉली बॉल पीच, विद्युत व्यवस्था, वॉटर कुलर, प्रेक्षक गॅलरी तसेच सेक्टर – ९, घणसोली येथे संत निरंकारी चौक सुशोभीकरण करून त्यामध्ये कारंजे बसविण्यात आले आहेत. त्याचबरोबर भूखंड क्र.३, सेक्टर -७ सानपाडा येथील झाशीची राणी मैदानात क्रिकेट, फुटबॉल, व्हॉली बॉल कब्बडी, विद्युत व्यवस्था, वॉटर कुलर, प्रेक्षक गॅलरी, चेंजिंग रूम, टॉयलेट इत्यादी सोयी सुविधांचा समावेश करून घेण्यात आला आहे. सदर मैदानाची सर्व कामे पूर्ण झाली असून त्याचा आज लोकार्पण सोहळा माननीय पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यावेळी खासदार राजन विचारे, शिवसेना उपनेते विजय नाहटा, जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, विठ्ठल मोरे, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, उपजिल्हाप्रमुख मनोज हळदणकर, प्रकाश पाटील, मिलिंद सुर्याराव, शहर प्रमुख प्रवीण म्हात्रे, उपशहर प्रमुख सुरेश सपकाळ, मंगेश साळवी, रामचंद्र पाटील, सोमनाथ वास्कर, जितू कांबळे, नगरसेवक नंदा काटे, सौ. दीपाली सपकाळ, ऋचा पाटील, ममीत चौगुले, आकाश मढवी, राजू कांबळे, रवींद्र पाटील, माजी परिवहन सदस्य विसाजी लोके, समीर बागवान इतर शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.