उरण : उरण तालुक्यातील जेष्ठ कवी भगवान पोसू म्हात्रे यांच्या विज्ञान रुची या विज्ञान कविता संग्रहाचे शुक्रवारी उरण येथील वासुदेव बळवंत फडके सभागृहात प्रकाशन करण्यात आले. विज्ञानावर आधारित विज्ञान रुची या त्यांच्या पहिल्या कविता संग्रहाचे प्रकाशन साहित्यिका ज्योत्स्ना राजपूत यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
रायगडभूषण प्रा एल बी पाटिल होते. त्यांनी रायगडातील पहिल्या विज्ञान कविता संग्रहाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे उद्घाटन साहित्यिक ए. डी. पाटील यांनी केले. रंजना केणी यांनी सूत्रसंचालन केले.
तिहेरी संगम असलेल्या या कार्यक्रमात यावेळी भगवान म्हात्रे गुरुजीं व त्यांच्या पत्नी लीलावती यांच्या लग्नाचा ५० वा आणि वयाचा ७५ वा वाढदिवस व कविता संग्रहाचे प्रकाशन ही करीत हा दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाला साई संस्थानचे रविशेठ पाटील,सी.ए.जे डी.तांडेल, माजी न्यायमूर्ती चंद्रहास म्हात्रे, शिवेंद्र म्हात्रे, मु.ग.पाटील ,माजी जिल्हा परिषद सदस्य जनू भोईर,कवी मारुती बागडे आदींसह त्यांचे विध्यार्थी, नातेवाईक आप्तेष्ट व मित्रपरिवार उपस्थित होता.