रबालेत नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलण्याचा घाट

नवी मुंबई-: नवी मुंबईतील रबाले एमआयडीसीत सिफि टेक्नॉलॉजी या खाजगी कंपनी मालकाकडुन एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून बेकायदेशीरपणे  नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे येत्या पावसाळ्यात नाल्याशेजारी आदिवासी पाड्याला एमआयडीसी भागाला पुराचा धोका वाढला आहे. तर याबाबत तक्रार करून देखिल कुठलिही कारवाई न करता उलट तक्रारदारालाच कंपनी व्यवस्थापनाकडून धमकावले जात आहे असा आरोप होत आहे.

एमआयडीसी भागात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक नाल्यांवर अतिक्रमण करून बांधकाम केले जात आहे. तसेच या नाल्यांचा प्रवाह देखील बदलला जात आहे. मात्र या साऱ्या प्रकाराकडे एमआयडीसी प्रशासनाचे अर्थपूर्ण दूर्लक्ष होत आहे. परिणाम स्वरूप या भागात पावसाळ्यात पुराचा धोका अधिक वाढत असुन २०१८ मध्ये तुर्भेतील इंदिरानगर मध्ये पुरात घरे वाहुन जाण्याची घटना घडली होती. मात्र अशी परिस्थिती असताना आता रबाले एमआयडीसी भागात  सिफि टेक्नॉलॉजी या  खाजगी कंपनीद्वारे बेकायदेशीरित्या नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलण्याचा घाट घातला जात आहे. नाल्याशेजारी झगडे यांची भात शेती आहे तसेच आदिवासी वस्ती ही आहे. त्यामुळे नाल्याचा प्रवाह बदलल्यास याठिकाणी पूराचा धोका निर्माण होऊ शकतो. याबाबत विनायक झगडे यांनी एमआयडीसीकडे तक्रार केली आहे. मात्र यावर कुठलीही काईवाई होत नाही.सदर काम बंद करावे म्हणून झगडे यांनी पाठपुरावा सुरू ठेवला असता कंपनी  व्यवस्थापनाकडून  तक्रारदारालाच दमदाटी केली जात आहे आणि याबाबत नवी मुंबई पोलीस देखील सहकार्य करीत नसल्याचा आरोप झगडे यांनी केला आहे. तर सदर नाल्यातुन डोंगरावरुन येणारे पाणी वाहून जाते आणि या  नैसर्गिक नाल्याच्या प्रवाहात जर बदल केला तर आजूबाजूच्या नागरीवस्तीत, एमआयडीसी भागात पाणी जाण्याची शक्यता आहे. तसेच शेतजमीन देखील पाण्याखाली येऊ शकते. त्यामुळे सदर काम तात्काळ थांबवण्यात यावे अशी मागणी विनायक झगडे यांनी केली आहे.
------------------------------------------
रबाले एमआयडीसीत खाजगी कंपनी द्वारे नैसर्गिक नाल्यात जे काम सुरू आहे ते काम थांबवावे म्हणून नोटीस बजावली असून येत्या दोन ते तीन दिवसांत सदर बांधकाम तोडण्यात येईल. - एस एस गित्ते, उपअभियंता ,भाग २, एमआयडीसी, महापे कार्यालय.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

केतकी चितळेची पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी