उरण शहरात गॅस शवदाहिनीचे भूमिपूजन
उरण : उरण शहराच्या हद्दीत उरण नगरपरिषद यांच्या पुढाकाराने उरण नगरपरिषदेच्या बोरी स्मशान भूमी येथे उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष माळी यांच्या हस्ते शुक्रवार (दि.२० ) मे रोजी गॅस शवदाहिनीचे भूमिपूजन करण्यात आले.
याप्रसंगी उरण नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष माळी, उरण नगरपरिषद अभियंता झुंबर माने, आरोग्य निरीक्षक हरेश तेजी, मेसर्स चिरंतन उद्योगचे विशाल केणी, उरण नगरपरिषदेचे कर्मचारी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते .
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोस्थान महा अभियान (जिल्हा स्तर) या योजनेकडे उरण नगरपरिषदने पाठपुरावा केला होता त्यला यश आले असून सदर योजनेकडून कामासाठी सुमारे ९४,७९,१८२ /- रुपये मंजूर झाले आहेत. या रकमेतून गॅस शवदाहिनी आस्थापित करणे, शव दाहिनी हॉल व शेडचे काम करण्यात येणार आहे. सदर काम मेसर्स चिरंतन उद्योग, नौपाडा ठाणे यांना दिले असून कार्यादेश दिल्यापासून १५० दिवसात पूर्ण करण्यात येणार आहे. अशी माहिती उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष माळी यांनी दिली.
उरण नगरपरिषदेच्या पुढाकाराने उरण नगरपरिषद हद्दीत गॅस शवदाहिनी होत असल्याने या पर्यावरण पूरक उपक्रमामुळे नागरिक कौतुक करीत आहेत.