घसरत्या कांदा दरांचा साठवणुकदार घेणार फायदा ?
नवी मुंबई-: राज्यात कांदा उत्पादन वाढल्याने वाशीच्या कृषी उत्पन्न बाजारात आवक वाढत आहे. मात्र आवक वाढल्याने कांद्याच्या दरात घसरण सुरु आहे. मागील एक दीड महिन्यापुर्वी २२ ते २५ रु प्रतिकिलो विकला जाणारा कांदा आता ८ ते १२ रु प्रतीकिलो विकला जात आहे. मात्र या घरणीचा फायदा साठवणूक दारांकडुन घेत स्वस्त दरात कांदा खरेदी करून पावसाळ्यात हाच कांदा जुन्या कांद्याच्या नावाखाली चढ्या भावाने विकला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात कांद्याचे दर कडाडण्याची शक्यता घाऊक व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
राज्यात मागील ऑक्टोंबर, नोव्हेंबर महिन्यात आलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते. आणि याचा सर्वाधिक फटका कांद्याच्या पिकाला बसला होता. त्यामुळे बाजारात कांद्याची आवक कमी होत असे. या दरम्यान अतिवृष्टीचे कारण देत जुन्या कांद्याची साठवणूक मुबलक प्रमाणात केली गेली. आणि महाराष्ट्रातील जुन्या कांद्याचा भाव वधारून २२ ते २५ रु घाऊक बाजारात विकला जात होता.
जुन्या कांद्याला भाव भेटत असल्याने त्याच्या खालोखाल नवीन कांद्याला ही चांगला दर मिळत असे. मात्र आता कांद्याच्या उत्पादनात मोठी वाढ झाली असल्याने मागील एक दीड महिन्यापासून बाजारात कांद्याची आवक देखील वाढत चालली आहे. परिणामी आवक वाढल्याने दरात घसरण होण्यास सुरुवात झाली आहे. बाजारात आता कांदा ८ ते १२ रु प्रतिकिलो विकला जात आहे. मात्र आता उत्पादन वाढल्याने आवक वाढत आहे. परिणामी दरात घसरण होत आहे आणि ही घसरण अजुन १० ते १५ दिवस राहणार आहे. मात्र या घसरणीचा फायदा साठवणूदारांकडुन घेतला जातो व मोठ्या प्रमाणात कांदा साठवला जातो. नंतर बाजारात जेव्हा कांद्याचा तुटवडा जाणवू लागतो तेव्हा हे साठवणुक दार आपला कांदा चढ्या भावाने बाहेर काढून विकत असतातआणि आगामी पावसाळ्यात अशाच प्रकारे दर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा प्रकारे प्रमाणापेक्षा जास्त कांदा साठवणूकदारांचा शोध घेऊन त्यांच्यावर जिल्ह्याधिकाऱ्यांनी कारवाई करावी अशी मागणी कांदा बटाटा व्यापारी मनोहर तोतलानी यांनी केली.