भावेनाट्यगृहाला नाट्यनिर्मात्यांची पसंती वाढली

नवी मुंबई-:कोविड टाळेबंदीनंतर वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृह  सवलती दरात प्रयोगांसाठी खुले करण्यात आले होते.सुरूवातीला नाट्यनिर्मात्यानी जरी पाठ फिरवली असली तरी ऑक्टोंबर २०२१ पासून  प्रयोगासाठी नाट्यनिर्मात्यांनी भावे नाट्यगृहाला पसंती दिली असून आता पर्यत  ८महिन्यात एकूण १५१ वेळा  बुकिंग झाले  आहे.

वाशीतील भावे नाट्यगृहाचे नूतनीकरणाचे काम आटोपताच कोविड संक्रमण आले. त्यामुळे लागलेल्या टाळेबंदित भावे नाट्यगृह बंद ठेवण्यात आले. त्यानंतर  ९  महिन्यानंतर ५० % आसन क्षमतेने सदर नाट्यगृह पुन्हा सुरू करण्यात आले. मात्र कोविड काळात रोजगारांवर जसे आर्थिक संकट ओढवले होते त्याच प्रमाणे कलाकारांवर देखील ओढवले होते. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेने नाट्यगुहाच्या दरात ७५% सवलत देण्याचा निर्णय घेतला. डिसेंबर २०२० मध्ये पहिला प्रयोग या  ठिकाणी पार पडला. मात्र नाट्यगृह जरी सुरू असले तरी कोविड संक्रमण कायम होते. त्यामुळे जानेवारी  २०२१ पासून  सप्टेंबर पर्यत भावे नाट्यगृहाला  नाट्यनिर्मात्यांकडुन अल्प प्रतिसाद भेटला. मात्र जस जसे कोविड संक्रमण कमी होत गेले व निर्बध हटवल्याने नाट्यगृहात नाटकांच्या प्रयोगात वाढ होत गेली. त्यामुळे २२  ऑक्टोबर २०२१ ते १६ मे २०२२ या आठ महिन्यांच्या कालावधीत आता पर्यत १५१ वेळा भावे नाट्यगृहाची वेळ बुकिंग झाले होते. तर महापालिकेडुन देण्यात येणारी सवलत ३० जून २०२२ पर्यत राहणार आहे. त्यामुळे सध्याची बुकिंग पाहता आगामी काळात  नाट्यगृहात अधीक खेळ होऊ शकतात अशी शक्यता भावे नाट्यगृह व्यवस्थापनाकडुन व्यक्त करण्यात आली.

खाजगी कार्यक्रमात ३० ते ३५ % वाढ

भावे नाट्यगृहात नाट्यप्रयोगासोबत  खाजगी संस्थाचे  व राजकिय पक्ष्यांचे कार्य क्रम होत असतात. मात्र सध्या बाहेर खाजगी सभागृहाचे दर अवाढव्य वाढले आहेत. तर वाशीतील भावे नाट्यगृहाचे दर हे परवडत असल्याने  भावे नाट्यगृहात मागील काही महिन्यांपासून खाजगी कार्यक्रमांचा ओढा वाढला असून त्यात दरवर्षी पेक्षा ३० ते ३५ % नी वाढ झालेली आहे.

भावे नाट्यगृह सध्या सवलतीच्या दरात देण्यात येत असल्याने येथे मागील सात आठ महिन्यात नाटकांच्या प्रयोगात वाढ झाली आहे. तर नाट्यगृहाच्या दरात पुढील काळात सवलती बाबत मनपा आयुक्तांसोबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.

मनोजकुमार महाले,

उपायुक्त, वाहन, यांत्रिकी आणि भावे नाट्यगृह. न.मु.म.पा.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

तळोजा वसाहतीत पोलीस ठाणे उभारणीचा प्रस्ताव शासन दरबारी