तळोजा वसाहतीत पोलीस ठाणे उभारणीचा प्रस्ताव शासन दरबारी 

खारघर :   पन्नास वर्षांपूर्वी तळोजा वसाहतीत उभारण्यात आलेल्या तळोजा पोलीस  ठाणे  त्यात  अपुऱ्या जागेमुळे काम करताना येणारी अडचण आणि गेल्या दहा वर्षात तळोजा वसाहतीच्या  लोकसंख्येचा विचार करून तळोजा सेक्टर बारा मध्ये तळोजा पोलीस ठाणे उभारण्यात येणार आहे. सदर पोलीस ठाणे उभारणीचा प्रस्ताव पोलीस प्रशासनाने राज्य शासनाकडे पाठविले आहेत. 
 
     तळोजा औद्योगिक क्षेत्रात कंपनी आणि कामगाराची वाढती लोकसंख्या आणि परिसरातील 28 गावातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पन्नास वर्षांपूर्वी तळोजा एमआयडीसी ठेवण्यासाठी  स्वतंत्र पोलीस ठाण्याची स्थापना करण्यात आली.  सध्यस्थित तळोजा औद्योगिक क्षेत्रात नऊशे कंपन्या तसेच  तळोजा, नावडे, घोट, पडघे, तळोजा मजकूर ,देवीचा पाडा, पेठाली, पेंधर, कोयनावळे, तोंडरे असे जवळपास अठावीस गावे असून नावडे गावालगत नावडे वसाहत आणि तळोजा मध्ये तळोजा फेज एक आणि दोन नवीन वसाहत आहे सिडकोकडून उभारल्या जाणाऱ्या गृह निर्माण प्रकल्प तसेच परिसरातील गावात उभारण्यात येणाऱ्या टोलेजंग इमारतीमुळे  तसेच बेलापूर पेंधर  मेट्रोमुळे येणाऱ्या दोन वर्षात तळोजा वसाहतीची लोकसंख्या दोन लाख्याच्या घरात जाण्याची शक्यता आहे. तळोजा वसाहत मधील वाढती लोकसंख्या विचारात घेवून सिडकोकडून नवी मुंबई पोलीस प्रशासनाने तळोजा वसाहत फेज एक  सेक्टर बारा प्लॉट न. चार  येथील भूखंडावर   पोलीस पोलीस तहानेने उभारण्यात येणार असून पोलीस प्रशासनाने  पोलीस ठाणे बांधकामाचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविले आहे. 
 
तळोजा पोलीस ठाण्यात केवळ 97 पोलीस बळ 
 
तळोजा पोलीस ठाणे अंतर्गत  पनवेल महापालिकेतील सर्वात मोठी औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणारी तळोजा एमआयडीसी क्षेत्र  आणि  नव्याने विकसित होत असलेल्या नावडे आणि तळोजा वसाहतीची लोकसंख्या तीन लाखाहून अधिक  असून तळोजा पोलीस ठाण्याची पोलिसबळ संख्या  केवळ 97 इतकी आहे.  वाढती लोकसंख्या आणि परिसरातील  नावडे आणि तळोजा वसाहतीच्या विकासात भर पडत आहेत.त्यात  गाव ,वसाहत आणि औद्योगिक क्षेत्रांत वाढती चोरी,घरफोडीच्या प्रमाणात वाढ आहे. तसेच विविध पक्षाचे मोर्चे आंदोलन, निवडणुका, सण, मिरवणुका,  धार्मिक स्थळांच्या जत्रा-यात्रा हे सर्व संभाळून जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्याची जबाबदारी निभावतांना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यातून  अनेक  गुन्ह्यांचा तपासकडे दुर्लक्ष आहे. त्यातअपुरे पोलीस ठाणे आणि मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे  कायदा आणि  सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात पोलिसांना  मोठी कसरत करावी लागत आहे. तळोजा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 97 पोलीस बळापैकी दोन पोलीस निरीक्षक, बारा सहायक पोलीस निरीक्षक असून 83 कर्मचारी आहे. त्यात न्यायालयीन कामकाज, तसेच काहींची साप्तहिक रजा असल्यामुळे ऐंशी पोलिसांना सर्व परिसरावर लक्ष केंद्रित करावे लागते. पोलीस प्रशासनाच्या माहितीनुसार तळोजा पोलीस ठाणे साठी 152 पोलीसबळाची मंजुरी आहे. मात्र अपुरा पोलीस बळामुळे काम करताना अनेक अडचणीला समोर जावे लागत असल्याचे येथील पोलिसांनी सांगितले. 
 
कोट -  तळोजा वसाहती मधील पोलीस ठाण्यात राखीव असलेल्या भूखंडावर पोलीस ठाणे उभारणीसाठी प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले आहे. तसेच तळोजा  पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या योग्य आहे. तळोजा वसाहतीत पोलीस ठाणे उभारल्यानंतर आणि वाढत्या लोकसंख्येचा विचार करून पोलीस बळ वाढविले जाईल. - अभिजित शिवथरे, पोलीस उपायुक्त, प्रशासन
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृतीपर उपक्रम तसेच डास उत्पत्ती शोध मोहीमेचे आयोजन