मनसेच्या पाठपुराव्यामुळे तरुणाला मिळाली पाच लाख नुकसानभरपाई

नवी मुंबई-: ऐरोली मध्ये राहणारा अक्षय हजारे या तरुणाला महापे एमआयडिसीतील एका कंपनीत झालेल्या अपघातात गंभीर दुखापत झाली होती. मात्र त्यास उपचार खर्च व पगार देण्यास कंपनी व्यवस्थापन टाळाटाळ करत होते. आणि या तुरुणाला मदत मिळावी म्हणून मनसे कामगार सेना सह चिटणीस बाळासाहेब शिंदे यांनी पाठपुरावा करताच कंपनी व्यवस्थापनाने  या तरुणाला पाच लाखाची नुकसान भरपाई केली.

नवी मुंबई ऐरोली येथील रहाणाऱ्या अक्षय हजारे या युवकाला महापे एम आय डी सी येथील आरती केमिकल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत लॅब असिस्टंट या हुद्यावर मुलाखतीसाठी बोलविण्यात आले असता. अक्षय हजारे सदरच्या कंपनीत गेल्यावर घडलेल्या घटनेत ज्वलनशील केमिकलमुळे अक्षय हजारे यास गंभीर दुखापत झाली.

त्यानंतर, कंपनीने त्वरित ऐरोली येथील नॅशनल बर्न हॉस्पिटलमध्ये त्यास दाखल केले. सदरच्या रुग्णालयाचा खर्च जास्त होत असल्याचे कंपनी प्रशासनाने सांगत अक्षय हजारेच्या परिवाराला त्यास दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात यावे असे सांगितले. परंतू, डॉक्टरांनी सांगितले की, अक्षय हजारे यास झालेली जखम गंभीर स्वरूपाची आहे त्यामुळे, अक्षयच्या परिवाराने दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यासाठी नकार दिला. त्यानंतर, २० दिवसानंतर कंपनीने रुग्णालय प्रशासनाला सांगून अक्षय हजारे यास घरी सोडण्यास सांगितले. त्यानंतर, पुन्हा त्याच रुग्णालयातील डॉक्टरांच्या सांगण्यानुसार शस्त्रक्रियेसाठी अक्षय हजारे यास नॅशनल बर्न रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र त्यानंतर, OCS आणि आरती केमिकल इंडस्ट्रीच्या माध्यमातून अक्षय हजारे यास दबाव  टाकून घरीच उपचार घेण्यास सांगण्यात आले.

त्यानंतर, अक्षय हजारे यास कामावर रुजू होण्यास सांगितले परंतू, कामावर असतांना त्यास शारीरिक त्रास होऊ लागल्याने. अक्षय हजारे यास कंपनीच्या डॉक्टरांकडून घरी आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आणि  २ महिन्यांनंतर अक्षय हजारे यांनी पुन्हा कामावर रुजू होण्यासाठी कंपनीला भेट दिली असता कंपनीने अक्षय यास कामावरून काढून टाकले असल्याचे सांगितले. त्यानंतर, अक्षय हजारे आणि त्याच्या परिवाराने मनसे कामगार सेनेचे सह चिटणीस बाळासाहेब शिंदे याकडे मदतीचा हात मागितला. त्यांनतर, बाळासाहेब शिंदे यांनी मनसे स्टाईलने कंपनी आणि सदरच्या ठेकेदाराला दणका देताच कंपनी प्रशासनाने अक्षय हजारे यास  रुग्णालयाचा खर्च ३,५०,००० रुपये  त्यासोबत, उपचार पूर्ण होईपर्यंत दरमहा १५,००० रुपये प्रमाणे २,५०,००० रुपये  पगार देण्यास  भाग पाडले. आणि आता पुढील उपचारासाठी एकरक्कमी ५,००,००० लाख रुपयांचे सहकार्य करावे यासाठी कंपनी प्रशासनाशी वारंवार पाठपुरावा करून अखेर अक्षय हजारे यास ५,००,००० लाख रुपयांचा धनादेश सदरच्या कंपनीकडून मिळवून दिला आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

प्रकाश बनकर ने पटकावला खासदार केसरीचा किताब