प्रकाश बनकर ने पटकावला खासदार केसरीचा किताब

 नवी मुंबई-: कोपर खैरणे युवा सेनेच्या वतीने खासदार केसरी या कुस्त्यांचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. यात महाराष्ट्र उपकेसरी राहिलेल्या प्रकाश बनकर यांनी हा खासदार 'किताब पटकावला आहे. खासदार राजन विचारे यांच्या हस्ते बनकर यांना एक लाखाचे पारीतोषिकाचे वितरण करण्यात आले .

  महाराष्ट्राच्या लाल मातीतील मर्दानी राज्यस्तरीय पैलवानाचा  कुस्त्याचा आखाड्याचे  प्रथमच आयोजन कोपर खैरणे युवा सेनेच्या वतीने खासदार केसरी या कुस्त्यांच्या आखाड्याचे आयोजन नवी मुंबई शहरात  कोपरखैरणे येथे करण्यात आले होते. यावेळी राज्यातील  १७ जिल्ह्यातील ९०पैलवानांनी सहभाग घेतला होता. त्यात प्रकाश बनकर , महाराष्ट्र उपकेसरी या पैलवानाने प्रथम क्रमांक.पटकावत खासदार 'किताब  मिळवला. तर वैभव रासकर द्वितीय व अमर पाटील याने तृतीय क्रंमांक पटकावला. विजेत्यांना प्रत्येकी एक लाख, पन्नास हजार व पस्तीस हजार अशी पारीतोषिके देण्यात आली. यावेळी खासदार राजन विचारे, जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर,  जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे, एम. के. मढवी , भरत नाईक SB ग्रुप, बंजरंग  संकपाळ ऐरोली विधानसभा युवासेना, मंगेश सकपाळ उपजिल्हा अधिकारी, हरेश जाधव ऐरोली विधानसभा समन्वयक, सदीप कदम युवासेना शहर अधिकारी,  विनोद सणस विभाग अधिकारी, विजय मोरे उपशहर अधिकारी , तेजस गोळे, हर्शल पाटिल  विभाग अधिकारी , किरण हिनुगले  विभाग प्रमुख , सूर्यकांत कचरे  आदी जण उपस्थित होते.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची जेएनपीए बंदरास भेट