सीबीडी मध्ये बौद्ध जयंती साजरी

खारघर : बौद्ध संशोधन व प्रशिक्षण संस्था आणि पंचशील महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सीबीडी बेलापूर येथील  बुद्ध भवन मध्ये बुद्ध जयंती पार पडली. यावेळी भगव्या बुद्धांची प्रतिमा आणि बोधी वृक्षांचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. यावेळी सदधम्म चळवळीच्या कार्यकर्त्या आशा शिंदे, अस्थीरोग तज्ञ डॉ शुभांशू भालाधरे, प्रा डॉ जी के डोंगरगावकर, नारायण वाघमारे, जे डी कसबे, एन एल सूर्यवंशी, रणजित बलखंडे, माया सुधाकर, सुजाता भोसले आदी उपस्थित होते. या वेळी  डॉ. शुभांशू भालाधरे यांनी  जगात 2566 वर्षांपूर्वी दुःख होते. दुःख आजही आहे. दुःख मुक्तीचा बुद्धांनी उपदेशीलेला मार्ग आजही कालसुसंगत आहे. विज्ञानाने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे. मात्र दुःखावरचे औषध वैज्ञानिकाने नव्हेतर बुद्धांनी शोधले ते सत्य आहे असे सांगितले. तर डॉ डोंगरगावकर यांनी बोधिवृक्ष आणि वैशाखी पौर्णिमेचे बुद्धांच्या जीवनात आणि आजच्या काळात असलेले महत्त्व सांगितले.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मनसेच्या पाठपुराव्यामुळे तरुणाला मिळाली पाच लाख नुकसानभरपाई