भाजपकडून नागरिकांना विविध सोयीसुविधा

पनवेल : नागरिकांचे जीवन सुकर व्हावे यासाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून विविध कामे, उपक्रम नेहमीच राबविण्यात येत असतात. जनसेवेचा हा वसा अविरत ठेवत उलवे नोडमध्ये 50% सवलतीच्या दरात फिल्टर आणि पिठाची गिरणी उपलब्ध करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सेक्टर 17 येथे बसथांबा उभारण्यात आला आहे. या दोन्हींचा शुभारंभ माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी झाला. उलवे नोड येथे  रामशेठ ठाकूर यांच्या विशेष प्रयत्नातून फिल्टर आणि पिठाची गिरणी 50% सवलतीच्या दरात उपलब्ध करण्यात आली आहे. या योजनेचा शुभारंभ रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. या योजनेंतर्गत 13,899 रुपये किंमत असलेला वॉटर फिल्टर 4,999 रुपयांना, तर 17,999 रुपये किमतीची पिठाची गिरणी फक्त सात हजार पाचशे रुपयांत मिळणार आहे. या सवलतीचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत यांनी केले आहे.  रामशेठ ठाकूर आणि भारतीय जनता पक्ष उलवे नोड यांच्या वतीने सेक्टर 17 येथे बसथांबा उभारण्यात आला आहे. सुसज्ज अशा या बसथांब्याचे उद्घाटन  रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमांना भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, पंचायत समिती सदस्य तथा महिला मोर्चा तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, तालुका चिटणीस वामनशेठ म्हात्रे, शेलघर गाव अध्यक्ष अमृत भगत, ग्रामपंचायत सदस्य योगिता भगत, कामिनी कोळी, उषा देशमुख, जयवंत देशमुख, हेमंत ठाकूर, सुधीर ठाकूर, अनंता ठाकूर, भाऊ भोईर, सुनील पाटील, अजय भगत, सुजाता पाटील, व्ही. के. ठाकूर, सुहास भगत, अंकुश ठाकूर, नवनाथ जाधव, शेखर काशीद, आशिष घरत, रणदिवे, गजानन घरत, अर्चना मिश्रा यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सफाईमित्रांच्या कुटुंबियांसमवेत नमुंमपा मुख्यालयात जागतिक कुटुंब दिन उत्साहात साजरा