यु.ई.एस. कॉलेज  ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नॉलॉजीमध्ये वार्षिक दीक्षांत समारंभ संपन्न

उरण : मुंबई विद्यापीठाच्या निर्देषानुसार, उरण शहरातील यु..एस. कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नॉलॉजीमध्ये शनिवार (दि.१४ )रोजी वार्षिक दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात आला होता. दीक्षांत समारंभचे प्रमुख पाहुणे यु..एस. संस्थेचे अध्यक्ष आर्किटेक्ट तनसुख जैन, उपाध्यक्ष मिलिंद पाडगांवकर, मानद सचिव आनंद भिंगार्डे, सहसचिव चंद्रकांत ठक्कर, सिनिअर कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या, सिनिअर कॉलेजच्या एचओडी उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाली. विद्यापीठ गीतानंतर संस्थेचे मानद सचिव आनंद भिंगार्डे यांनी पदवी प्रदान सोहळा सुरु करावे असे जाहिर केले.

प्रमुख पाहुणे यु..एस. संस्थेचे अध्यक्ष आर्किटेक्ट तनसुख जैन ह्यांनी आपल्या भाषणातून विदयार्थ्यांना पुढील भवितव्यासाठी मार्गदर्शन केले. तसेच सिनिअर कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या ह्यांनी शैक्षणिक अहवालाचे वाचन केले विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. बीएससीआयटी विभागाचे ०७ आणि कॉमर्स विभागाचे २५ असे एकूण ३२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. त्यानंतर संस्थेचे मानद सचिव आनंद भिंगार्डे यांनी पदवी प्रदान सोहळा समाप्त झाला असे जाहीर केले. विद्यार्थ्यीही पदवी प्रदान सोहळ्यामुळे नंदी भावूक झाले होते. अशा रितीने मुंबई विद्यापीठाच्या नियमानुसार अत्यंत पध्दतशिरपणे हा संपूर्ण दीक्षांत समारंभ पार पडला.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

बाजारात लिंबूचे दर निम्यावर