सिडकोकडून पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे, खाजगी टँकर साठी तीन महिन्यात  मोजले 25 लाख रू.

खारघर :  ज्या गृह निर्माण सोसायटीत कमी दाबाने पाणी पुरवठा होत असेल अश्या सोसायटीत सिडकोकडून विनामूल्य टँकर पुरविले जाईल असे आश्वासन सिडकोच्या वतीने देण्यात आले आहे. मात्र खारघर  मधील महावीर हेरिटेज सोसायटीने  टँकरची मागणी करूनही मिळत नसल्यामुळे  तीन महिन्यात पंचवीस लाख रुपये खर्चून पाणी विकत घेण्याची वेळ सदर सोसायटीवर आल्याने नागरिकांमध्ये सिडकोच्या विरोधात संतापाचे वातावरण पसरले आहे.  
 
     खारघर परिसरात गेल्या काही महिन्यापासून  कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. रहिवासीयांनी मोर्चे आंदोलन केल्यावर सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे यांनी ज्या गृह निर्माण सोसायटीत कमी दाबाने पाणी पुरवठा होत असेल अश्या सोसायटीत सिडकोकडून विनामूल्य पाणी टँकर पुरविले जातील असे आश्वासन दिले. त्यासाठी सिडकोने टँकरची निविदा काढून खारघर आणि तळोजामध्ये विनामूल्य टँकरने पाणी पुरवठा करीत आहे. मात्र काही सोसायटीने सिडकोकडे टँकरची मागणी करूनही मिळत नसल्याचे रहिवासीयांकडून सांगितले जाते. दरम्यान खारघर सेक्टर पस्तीस जी मधील महावीर हेरिटेज सोसायटीत तीनशेहूनन अधिक फ्लॅट आहे. कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्यामुळे सिडकोकडे  टँकरची मागणी करूनही मिळत नसल्यामुळे  गेल्या तीन महिन्यापासून पाणी विकत घेवून गरजा पूर्ण कराव्या लागत असून फेब्रवारी, मार्च आणि एप्रिल  या तीन महिन्यात टँकरसाठी सोसायटीला पंचवीस लाख रुपये मोजावे लागले आहे. त्यात सोसायटीत टँकरने येणारे पाणी हे बोअरवेल असल्यामुळे पिण्यासाठी प्रत्येक सोसायटीत बिसलेरी पाण्यासाठी वेगळे पैसे मोजण्याची वेळ सोसायटीच्या सदस्यावर आली आहे. सिडकोकडून टँकरने पाणी पुरवठा केला जाईल असे आश्वासन देवूनही अनेक सोसायटीत मागणी करूनही वेळेवर टँकर मिळत नसल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.  
 
कोट  - सिडकोकडून खारघर सेक्टर अकरा आणि सेक्टर सत्तावीस येथील जलकुंभ मधून टँकरने पाणी वितरण केला जात आहे. टँकरने पाणी वितरण करताना मागणी करूनही सोसायटीत पाणी मिळत नाही, - मेघनाथ ठाकूर, मुर्बीगाव 
 
कोट  -   महावीर सोसायटीत दैनंदिन चारशे वीस युनिट पाण्याची आवश्यकता आहे. बुधवारी केवळ बावीस युनिट पाणी प्राप्त झाले. कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्यामुळे सिडकोकडे अनेक वेळा टँकरची मागणी केली, मात्र तीन महिन्यात एकही टँकर मिळाले नाही. गेल्या तीन महिन्यात सोसायटीने पंचवीस लाख रुपये खर्च करावे लागले, पावसाळापर्यंत किती पैसे खर्च करावे लागेल असा प्रश्न पडला आहे. त्यात बोअरवेलच्या पाण्यामुळे आजाराची भीती असल्यामुळे पिण्यासाठी दुकानातून बिसलेरी पाणी विकत घेवून प्यावे लागत आहे. - डॉ सोनल दिसले,सदस्य महावीर हेरिटेज सोसायटी सेक्टर पस्तीस खारघर 
 
कोट : महावीर हेरिटेज सोसायटीत दिवसातून या पुढे तीन टॅंकर पाणी उपलब्ध करून दिले जातील. - नानिक चोइथानी,कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभाग सिडको.
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत भव्य रक्तदान शिबिर संपन्न