डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत भव्य रक्तदान शिबिर संपन्न

उरण : पद्मश्री पुरस्काराने सन्मानित असणारे आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत जेएनपीटी वसाहत मधील मल्टिपर्पज सभागृहा मध्ये गुरुवारी ( दि१२)  रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये ७१९  दास्य भक्त रक्तदात्यानी आपले मोलाचे रक्तदान केले आहे. या शिबिरामध्ये तीन रक्त पेढ्यानी आपली टीम तैनात केली आहे. जेजे महानगर ब्लड बँक, जिल्हा रुग्णालयअलिबाग रक्त केंद्र , डी वाय पाटील रक्त पेढी यांचे सहकार्य मिळाले .

डॉ नानासाहेब प्रतिष्ठान मार्फत घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उदघाटन जेएनपीटीचे मुख्य प्रबंधक जयवंत ढवळे यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी,जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, ब्ल्यू स्टार सिक्युरिटीचे संचालक विकास भोईर, पंचायत समिती सदस्य दीपक ठाकूर, जेएनपीटीच्या अधिकारी मनीषा जाधव, डॉ राज हिंगोराणी, जेजे महानगर ब्लड बँक  पीआरओ अजय , डी वाय पाटील ब्लड बँकेचे प्रसाद कुलकर्णी, हेगडे मॅडम, जिल्हा रुग्णालय अलिबाग रक्त केंद्रचे डॉ श्रेयस पाटील, श्री सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.

        आज सर्वत्र रक्ताची गरज भासत आहे अनेकांना रक्त न मिळाल्याने आपले प्राण गमावले आहेत. त्यामुळे भासत असलेली रक्ताची गरज दूर करण्यासाठी पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्ताने डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या मार्फत रक्तदान शिबिर संपन्न झाले.

या अगोदर ही डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत भव्य रक्तदान शिबिर आरोग्य शिबीर, स्वच्छता मोहीम,  वृक्ष लागवड,  वृक्ष संवर्धन मोहीम राबविण्यात आली आहे. शिबिरामध्ये रक्तदान करण्यासाठी दास्य भक्तांनी सकाळ पासूनच शिस्त बद्ध पद्धतीने आपला सहभाग घेतला होता.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

दिघा व ऐरोली विभागातील मान्सुनपूर्व कामांची आयुक्त अभिजीत बांगर यांनी केली प्रत्यक्ष पाहणी