नेरुळ मधील आगरी कोळी भवन  सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी खुले

नवी मुंबई-: कोरोना काळखंडात कोविड सेंटरच्या नावाखाली आगरीकोळी भवन मनपाच्या ताब्यात होते. मात्र कोरोना लाट ओसरल्यानंतर  सदर भवन सांस्कृतिक कार्यक्रमासाठी खुले करण्यात आले नव्हते. त्यामुळे सदर भवन सांस्कृतिक कार्यक्रमासाठी खुले करावे म्हणून माजी नगरसेवक नामदेव भगत यांनी प्रशासनासोबत पाठपुरावा केला होता. आणि त्याला यश आले असून सदर भवन आता खुले करण्यात आले आहे.

नवी मुंबई शहरात कोविड संक्रमण वाढत असताना रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिने कोविड केअर सेंटर सुरू केले होते. त्यावेळी खाजगी जागासोबतच मनपाच्या जागा देखील वापरात होत्या. त्यात नेरुळ मधील आगरीकोळी भवन देखील होते. मात्र कोरोनाची लाट ओसरल्यानंतर महापालिकेने वाशी व्यतिरिक्त सर्व कोविड सेंटर बंद केले होते. मात्र आगरी कोळी भवन  खुले केले नव्हते. त्यामुळे या भागातील नागरीकांना लग्न कार्य तसेच इतर विधींसाठी हॉल भेटणे मुश्कील होऊन बसले होते. तर या ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन देखील बंद होते. त्यामुळे सदर आगरीकोळी भवन हे पुन्हा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी खुले करावे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व माजी नगरसेवक  नामदेव भगत यांनी पाठपुरावा सुरू ठेवला होता आणि त्यांच्या  पाठपुराव्याने ८ मे २०२२ रोजी आगरी कोळी भवन येथील सांस्कृतिक कार्यक्रम सुरू करण्यास प्रशासनाची मान्यता मिळाली आहे. त्याच बरोबर दोन वर्षापासून बंद असलेल्या कर्मचाऱ्यांचे काम सुद्धा सुरू करण्यात आले आहे, त्यामुळे आगरी कोळी भवन येथील सर्व कामगारांनी  नामदेव भगत यांचे आभार मानले व त्यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक१३ मे रोजी पूजन करून व श्रीफळ वाढवून कामाची सुरुवात करण्यात  आली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पावसाळापूर्व कामे 15 मे पर्यंत पूर्ण करण्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांचे आढावा बैठकीमध्ये निर्देश