वाशीत १३ ते १६ मे दरम्यान प्रॉपर्टी प्रदर्शन
नवी मुंबई ः क्रेडाई आणि बिल्डर असोसिएशन ऑफ नवी मुंबई (बीएएनएम) यांच्या वतीने २० वे मेगा प्रॉपर्टी प्रदर्शन १३ ते १६ मे २०२२ या कालावधीत भरविण्यात येणार आहे. हे प्रॉपर्टी प्रदर्शन वाशी रेल्वे स्थानक जवळील सिडको एविझबिशन सेंंटरच्या बाजुला असणाऱ्या महभूखंड क्रमांक-११ ते १४ वर भरविले जाणार आहे.
या प्रदर्शनात नवी मुंबईतील २० लाख रुपयांपासून ते १० कोटी रुपये किंमत असणाऱ्या सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर दोन वर्षाच्या कालावधीनंतर सदरचे प्रदर्शन होत असून या प्रदर्शनाला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आयोजकांना आहे.
या प्रॉपर्टी प्रदर्शनात एकाच छताखाली जवळपास १०० हुन अधिक बांधकाम व्यावसायिकांचे स्टॉल असणार आहेत. त्यामुळे नवी मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी या प्रदर्शनाद्वारे पर्याय उपलब्ध होणार आहे. मुंबईतील घरांच्या किंमतीच्या तुलनेत नवी मुंबईत सर्वसामान्यांना विकायतशीर आणि परवडणारी घरे खरेदी करता येणे यामुळे शवय होणार आहे. तसेच येणाऱ्या ग्राहकांना विकासकांशी वन टू वन चर्चा करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. याशिवाय घरे विकत घेणाऱ्या ग्राहकांना वित्तीय सहाय्य अथवा कर्जाशी संबंधी मार्गदर्शन करण्यासाठी काही वित्तीय संस्था, बँका यांचा देखील या प्रदर्शनात सहभाग असणार आहे.