कडक उन्हाळ्याचा मोरबेतील पाणीसाठयाला फटका
मागील वर्षी ४१.२३ तर आता ४०.६२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा
नवी मुंबई-: सध्या उन्हाचा पारा वाढत असून दुपारच्या वेळी कडक उन्ह पडत आहे. आणि या उन्हाच्या तडाख्याचा परीणाम मोरबे धारणातील जलसाठयाला बसत असून धरणाच्या पाण्याची पातळी कमी झाली आहे. मागील वर्षी ४१.२३ तर आता ४०.६२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे नवी मुंबई करांना ऑगस्ट अखेर पर्यंत पुरेल इतका मूलबक पाणीसाठा धरणात उपलब्ध आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.
नवी मुंबई करांची तहान मोरबे धरणातुन भागवत जाते. मागील वर्षीच्या तुनेलत यंदा मोरबे धरण क्षेत्रात अधिक पावसाची नोंद झाली होती. यंदा ४२२९मिमी तर मागील वर्षी २०२१-२२मध्ये ३०९३ मिमी पावसाची नोंद झाली होती. समाधानकारक पाऊस पडल्याने धरणाने ८८ मीटर जलसाठ्याची पातळी पार केली होती. धरणाची १९०.८९ दशलक्ष घनमीटर क्षमता असून सध्या स्थितीला ७४.३६ मी पाण्याची पातळी तर ७७.५५१ दशलक्ष घनमीटर पाणी साठा उपलब्ध आहे. हा उपलब्ध पाणीसाठा ऑगस्ट अखेरपर्यंत पुरेल अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. यंदा सप्टेंबरमध्ये धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. मात्र आता कडक उन्ह पडले असून पाण्याचे बाष्पीभवन होत असून पाण्याची पातळी कमी होत आहे. यंदा १०.६८ दशलक्ष घनमीटर पाण्याचे बाष्पीभवन होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. नवी मुंबई शहराला दिवसाला ४५० एमएलडी, कामोठे खारघर पाणीपुरवठा केला जातो . तसेच दिघा ते महापे या झोपडपट्टी भागाला एमआयडीसीकडून ५०ते ६० एमएलडी पाणी पुरवठा केला जात आहे. मागील वर्षी मागील वर्षी ४१.२३ तर आता ४०.६२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. कडक उन्हाने बाष्पीभवन होत आहे त्यामुळे पाण्याची पातळी कमी होत आहे अशो माहिती पाणीपुरवठा विभागाचे वसंत पडघम यांनी दिली आहे.