खारघर : महावितरण कडून कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देता वीज पुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे ऑनलाइन आणि ऑनलाइन सुरू असलेल्या शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नाहक त्रास होत आहे.महावितरण कडून सदर समस्या दूर करावी अन्यथा भाजपकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल असे निवेदन भाजपच्या शिष्टमंडळाने खारघर मधील महावितरण अधिकाऱ्यांना दिले.
गेल्या काही दिवसांपासून तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे.त्यात शाळा आणि महाविद्यालयायीन विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू आहे. त्यात महावितरण कडून कोणत्याही प्रकारची सूचना न देता वीज पुरवठा खंडित होत केला जात असल्यामुळे खारघर मधील भाजपचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी खारघर महावितरण कार्यालयातील अधिकारी एम आर पाटील यांची भेट घेवून भारनियमामुळे भेडसावणाऱ्या सर्व समस्यांची माहिती दिली.ज्या दिवशी वीजपुरवठा खंडित केला जात असतील त्यांची माहिती नागरिकांना द्यावी.महावितरण कडून मनमानी सुरू केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा दिला.