उरणकरांसाठी मोफत महाआरोग्य शिबीर

मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान उरण व एम.जी.एम. हॉस्पिटल वाशी (नवी मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य शिबीर

उरण : मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान उरण व एम. जी. एम. हॉस्पिटल वाशी (नवी मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य शिबीर रविवार दिनांक १५-०५-२०२२ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ४.०० या वेळेत उरण नगरपरिषद शाळा, पेन्शनस पार्क, एनएमएमटी बस स्टँडच्या समोर उरण शहर येथे आयोजित करण्यात आले आहे.

सदर आरोग्य शिबिरात जनरल तपासणी, दंत तपासणी, डोळे तपासणी, रक्तदाब तपासणी, हाडांचे आजार तपासणी, मधुमेह रक्त तपासणी, स्त्रीरोग तपासणी, ई. सी. जी आदी तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत. तसेच ठराविक चष्म्यावर ५०% सवलत देण्यात येणार आहे.

गरजूंनी, रुग्णांनी या आरोग्य शिबिराचा, सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान उरण, MGM हॉस्पिटल वाशी नवी मुंबई, आर्ट ऑफ लिव्हिंग उरण, त्रिलोचन आय केअर क्लिनिक उरण यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

रामशेठ ठाकूर व कुटुंबियांचा रयत शिक्षण संस्थेच्यावतीने हृद्य सत्कार