रामशेठ ठाकूर व कुटुंबियांचा रयत शिक्षण संस्थेच्यावतीने हृद्य सत्कार
सातारा : ज्ञानाच्या आधाराशिवाय प्रगती होत नाही त्यामुळे ती संधी प्रत्येकाला मिळाली पाहिजे हे उद्दिष्ट पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांचे राहिले, त्यामुळेच रयत शिक्षण संस्था देशातील एक नंबरची संस्था झाली असून लोकनेते रामशेठ ठाकूर या संस्थेच्या कार्याला मदतीचा हात खुल्ला करून देत असतात, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी (दि.०९) सातारा येथे केले.