आदिवासी पाड्यात ग्रामस्थांचा मालमता कर रद्द करा - युवासेनेची मागणी
खारघर : खारघर परिसरात असलेल्या आदिवासी पाड्यात ग्रामस्थांना पालिकेकडून भरमसाठ मालमत्ता कर लावण्यात लावण्यात आले आहे. सदर ग्रामस्थ मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत आहे. त्यामुळे पालिकेने पाड्यातील ग्रामस्थांचे मालमत्ता कर रद्द करण्यात यावे मागणी युवा सेनेच्या शिष्ठमंडळाने पालिका आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेवून केली. या शिष्ठमंडळात युवासेना उपजिल्हा अधिकारी अवचित राऊत, खारघर शहर संघटक अनिल पाटील, पनवेल उपतालुका संघटक शंकर ठाकूर, खारघर विभाग संघटक रामचंद्र देवरे, विभाग प्रमुख उत्तम मोर्बेकर, युवासेना पनवेल उपतालुका अधिकारी अनिकेत पाटील, खारघर विभाग अधिकारी प्रेम ठाकूर, युवासैनिक रोशन पाटील तसेच आदिवासी पाड्यातील ग्रामस्थ उपस्थित होते.