उरण : उरण पोलिसांनी मनसेच्या पाच पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई केली असल्याची माहिती उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी दिली.
यामध्ये रायगड जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, मनसे वाहतूक महाराष्ट्र प्रदेश चिटणीस अल्पेश कडू, रायगड उप-जिल्हा संघटक सतीश पाटील, उरण तालुका उपाध्यक्ष मंगेश वाजेकर, मनसेचे उरण तालुका संघटक सेनेचे रितेश पाटील यांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी दिली.