सीबीडी वासियांनी घेतला ‘म्युझियम ऑन व्हील वस्तुसंग्रहालयाचा आनंद
खारघर: धकाधकीच्या जीवनात वस्तुसंग्रहालयाला भेट देण्यास वेळ मिळत नसल्याने सीबीडी मधील शालेय विद्यार्थी आणि नागरिकांना संग्रहालयची माहिती मिळावी म्हणून ऍग्रो गार्डन सोसायटीच्या वतीने वतीने आणि छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या सहकार्याने सीबीडी येथे राबविण्यात आलेल्या ‘म्युझियम ऑन व्हील’ या उपक्रमात दीडशेहून अधिक विद्यार्थी आणि नागरिक सहभागी झाले होते.
छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयास भेट देणाऱ्यांची संख्या तुलनेत कमी असल्याने वस्तुसंग्रहालय नागरिकांच्या दारी पोहोचविण्यासाठी आगळावेगळा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी मोठय़ा वातानुकूलित बसमध्ये विविध वस्तूंसाठी काचेच्या पेटय़ा, माहिती संच, कलाकृती, दृक्श्राव्य साधने, डिजिटल टॅबलेट्स आदी उपकरणांची व्यवस्था करण्यात आली आहे. असून प्रदर्शनाची माहिती तज्ज्ञ मंडळींद्वारे विद्यार्थ्यांना समजावून सांगितली जाते. म्युझियम ऑन व्हील’ या वाहनात ज्यामध्ये 'साउंड टू म्युझिक' या विषयावर प्रकाश टाकण्यात आला होता, म्युझियम ऑन व्हील’ सतार, तानपुरा, हार्मोनियम, बासरी, शेणई, तबला, पकवाज यांसारखी अनेक शास्त्रीय वाद्य होती. म्युझियम ऑन व्हीलमध्ये प्रत्येक वाद्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स डिस्प्ले ठेवण्यात आला होता आणि डिस्प्लेवर क्लिक केल्यावर त्या वाद्यानुसार विविध प्रकारचे आवाज वाजत आहेत. तसेच ब्रह्मांडात प्रारंभिक ध्वनी कसा निर्माण झाला आणि शास्त्रीय वाद्ये ध्वनीशी कशी जोडलेली असून त्यांचा विद्यार्थांनी आनंद घेतला. यावेळी नवी मुंबईतील लोकांनी बोटॅनिकल गार्डनमध्ये फिरण्याचा आनंद लुटला.