घणसोलीमध्ये महापालिका अधिकाऱ्यांकडून माणुसकीचे दर्शन

 

ऐरोली : घणसोली येथे एका रस्त्याच्या दुभाजकावर बेशुध्द असलेल्या इसमाला नवी मुंबई महापालिका अधिकारी यांनी मानवतावादी दृष्टिकोन ठेऊन मदत केली. तसेच उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याने त्या इसमाला जीवदान मिळाले आहे. जीवदान देणाऱ्या महापालिका अधिकाऱ्याचे नाव आहे अभियंता रोहित ठाकरे. या मानवतावादी दृष्टीकोनाबद्दल रोहित ठाकरे यांच्यावर घणसोली मध्ये कौतुकाची छाप पाडत आहे.

घणसोली सेक्टर ९ येथील रस्त्याच्या दुभाजकावर एक पंचावन्न वर्षीय बेवारस इसम निपचित पडला होता.आगदी त्याच वेळेस काही कामानिमित्त घणसोली विभाग कार्यालयाचे अभियंता रोहित ठाकरे व अधीक्षक संतोष सिलाम पेट्रोलिंग करत होते.त्यावेळी त्यांना एक इसम निपचित पडल्याचे लक्षात आले.त्यावेळी त्यांनी क्षणात आपल्या चालकाला वाहन थांबविण्यास सांगितले.त्यांनी मग त्या इसमाला पाणी मारून शुध्दीवर आणले.त्यानंतर तत्काळ पाणी व ज्यूस त्याला प्यायाला दिले.

त्या बेवारस इसमाची परिस्थिती नाजूक आहे.हे पाहून त्यांनी प्रथम संदर्भ रुग्णालयात दूरध्वनी करून रुग्णवाहिका मागवली.मग त्या इसमाला रुग्णवाहिकेत बसवून त्याला मनपा रुग्णालयात पाठविण्यात आले व त्या बेवारस इसमावर पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारास सुरुवात केली.या मानवतावादी दृष्टिकोनामुळे पालिका अधिकाऱ्याचे कौतूकाची थाप पडत आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कोपरखैरणेतील वाहतूक कोंडी फुटणार