धारण तलाव स्वच्छतेसाठी  मनपाला  एमसीझेडएमए परवानगीची प्रतीक्षा 

नवी मुंबई -:नवी मुंबईतील धारण तलाव गळासोबत खारफुटीने भरल्याने शहरात दरवर्षी पाणी भरत असून शहराला पुराच्या पाण्याचा धोका कायम आहे. त्यामुळे हे धारण तलाव साफ करण्यासाठी मनपा सज्ज आहे. मात्र यास एमसीझेडएमए अजुन परवानगी आली नाही. त्यामुळे या परवानगीच्या प्रतीक्षेत मनपा प्रशासन असून ही परवानगी आली तर धारण तलावांच्या सफाईचा मार्ग मोकळा होणार आहे.

नवी मुंबईत शहर हे खाडी किनारी वसले आहे. त्यामुळे खाडीत येणाऱ्या भरतीचे पाणी शहरात येऊ नये व शहरातील  सांडण्याचा निचरा खाडीत व्हावा या हेतूने सिडकोने नवी मुंबईतील विविध भागात धारण तलाव बनवले आहेत.  मात्र आज या धारण तलावांची दुरावस्था झाली आहे. शहरातील सिडको कालीन सर्वच धारण तलाव मागील अनेकवर्षं साफ न केल्याने ते गाळाने व खारफुटीने  भरलेले आहेत. गाळ आणि खारफुटीने भरल्यामुळे त्या धारण तलावांची स्वच्छता रखडली आहे.  सदर तलाव साफ करण्यास कांदळवन विभागाची अडचण येत आहे. त्यामुळे धारण तलाव साफ करावे म्हणून माजी नगरसेवक जयाजी नाथ व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ओबीसी सेल सचीव डॉ. विनोद शंकर पाटील यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे आणि त्याअनुषंगाने धारण तलाव साफ करण्याहेतू तोडगा काढण्यासाठी  सीबीडी येथील होल्डिंग पौंड वर २४ फेब्रुवारी २०२२ रोजी एक संयुक्तीत पाहणी दौऱ्याचे आयोजन केले होते. यात  आयआयटीचे जनसंपर्क अधिकारी ज्योती प्रकाश, स्कोनचे ग्लोडविन, नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील  हजर होते आणि या समितीचा अहवाल प्राथमिक स्तरावर सकारात्मक आला आहे. मात्र अद्याप एमसीझेडएमएची मंजुरी मिळाली नाही. त्यासाठी मनपा प्रशासनाने प्रायोगिक तत्वावर वाशी आणि बेलापूर धारण तलावांच्या सफाईसाठी परवानगी मागितली आहे. मात्र ही परवानगी अजून प्राप्त न झाल्याने या परवानगीच्या प्रतीक्षेत मनपा प्रशासन आहे.

धारण तलावांच्या  साफसफाई सफाई साठी आम्ही एमसीझेडएमएच्या मंजुरीसाठी अर्ज केला आहे.तर सदर प्रश्न सध्या न्याय प्राविष्ट आहे. त्यामुळे एमसीझेडएमएची मंजुरी मिळाल्यानंतर आम्ही न्यायालयात प्रतिज्ञा पत्र सादर करू व न्यायालयाचा ना हरकत दाखला आल्यानंतर धारण तलावांची सफाई केली जाईल. - मजोज पाटील,अतिरिक्त शहर अभियंता, पाणीपुरवठा विभाग, न.मु.म.पा.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापेत डिझेल चोरीचे सत्र सुरूच, प्रशासनाचे दुर्लक्ष