आरपीआय नवी मुंबई युवक आघाडीचे उपाध्यक्ष विशाल कांबळे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

नवी मुंबई : आरपीआयचे नवी मुंबई युवक आघाडीचे उपाध्यक्ष विशाल कांबळे (34) यांचे शुक्रवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने दु:खद निधन झाले. त्यांच्या पाठीमागे पत्नी, मुलगा, आई-वडील व तीन भावंडे असा परिवार आहे. सायंकाळी त्यांच्यावर तुर्भे येथील स्मशानभुमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.  
तुर्भे विभागात राहणारे रिपब्लिकन पक्षाचे नवी मुंबईचे जेष्ठ उपाध्यक्ष नागेश कांबळे यांचे चिरंजीव असलेले विशाल कांबळे हे अतिशय होतकरु, प्रामाणिक व आंबेडकरी चळवळीशी एकनिष्ठ होते.

गेल्या अनेक वर्षापासून ते नवी मुंबई युवक आघाडीचे उपाध्यक्ष म्हणुन तुर्भे स्टोअर्स विभागात कार्यरत होते. शुक्रवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास   विशाल कांबळे यांना अत्यवस्थ वाटु लागल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यापुर्वीच त्यांना ह्रदय विकाराचा झटका आल्याने त्यांचे दु:खद निधन झाले. विशाल कांबळे यांच्या निधनामुळे संपूर्ण नवी मुंबईतील रिपब्लिकन चळवळीवर शोककळा पसरली आहे. तरुण कार्यकर्ता असलेल्या विशाल कांबळे याचे अशा पद्धतीने निधन झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शुक्रवारी सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी रिपब्लिकन पक्षातील ज्येष्ठ नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येन उपस्थित होते.  

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

भारताचा ओम वर्मा टेनिस चॅम्पियन; रामशेठ ठाकूर इंटरनॅशन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा खेळाडू