भारताचा ओम वर्मा टेनिस चॅम्पियन; रामशेठ ठाकूर इंटरनॅशन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा खेळाडू

पनवेल:  श्रीलंकेत संपन्न झालेल्या एशियन टेनिस फेडरेशनच्या १४ वर्षाखालील आंतरराष्ट्रीय लॉन टेनिस चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघ तसेच रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या ओम वर्मा या खेळाडूने जर्मनीच्या लुईस एलिह नीसे याला पराजित करून विजेतेपद पटकाविले.  

       श्रीलंकेतील कोलंबो झालेल्या एटीएफ १४ अंडर सिरीज या स्पर्धेत श्रीलंका, यूएसए, भारत, कोरिया आणि जर्मनीच्या खेळाडूंनी भाग घेतला होता.  उपांत्यपूर्व फेरीत ओम वर्मा याने श्रीलंकेच्या आहिल मोहमद कलिल याला ६-२ आणि ६-२, तर उपांत्य फेरीत श्रीलंकेच्याच साहा कपिलसेना याला ६-२ व ६-३ या सरळ सेटने पराभव केला. २९ एप्रिलला झालेल्या अंतिम सामन्यात जर्मनीच्या खेळाडूचाही ६-३, व ६-४ अशा सरळ सेटमध्ये पराभव करत ओम वर्मा ने बाजी मारली. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या उलवा नोड येथे असलेल्या रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स क्लबचा ओम सदस्य असून तो या ठिकाणी टेनिसचा सराव करत आहे. त्याच्या या यशाबद्दल विविध स्तरातून त्याचे अभिनंदन होत आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवतंत्रज्ञान विकासासाठी तरूणाईने पुढे यावे - अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर