घणसोली मधील उद्यानात स्वच्छ, थंड पाणी उपलब्ध करण्याची 'मनसे'ची मागणी 

ऐरोली : घणसोली परिसरात मोक्याच्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची उद्याने नवी मुंबई महापालिका प्रशासनाने कोट्यवधी रुपये खर्च करुन विकसित केली. परंतु पिण्याच्या पाण्याची सोय मात्र केली गेली नाही.म्हणून त्यानंतर दोन महिन्यांपूर्वी आधुनिक प्रकारच्या पाणीपोईची व्यवस्था करण्याचे निवेदन मनसे कडून घणसोली विभाग कार्यालयाला दिले. त्यानंतर महापालिकेकडून जुनाट पाणीपोई बसविण्यात आल्या आहेत.यामधून नागरिकांना गरम आणि अशुध्द पाणी पिण्यास मिळत आहे. यावर मनसे आक्रमक झाली असून शुद्ध आणि थंड पाणी मिळावे म्हणून मनसे नवी मुंबई शहर संघटक संदीप गलगुडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सोमवारी निवेदन देऊन दिला आहे.

घणसोली नोडल परिसरात सेंट्रल पार्क व विविध प्रकारच्या उद्यानांची निर्मिती पालिकेने केली आहे.या उद्यानात दरदिनी सकाळी व सायंकाळी नागरिकांची मोठी गर्दी असते.तर सेंट्रल पार्क सारख्या आधुनिक पार्क मध्ये तर नागरिकांची जत्रा असते.त्याच बरोबर  सुरू असलेल्या बेफाम उष्णतेमुळे नागरिक थंडगार हवा मिळावी.म्हणून नागरिक उद्यानाचा आसरा घेत आहेत. उन्हाच्या कडाक्यात पाण्याची गरज असते.परंतु सुसज्ज व आधुनिक निर्मिती करण्यात आलेल्या उद्यानात पाणीपोईची सुविधा नव्हती.म्हणून मनसे कडून १४ मार्च रोजी निवेदन देऊन पाण्याची व्यवस्था करावी अशी लेखी मागणी केली गेली होती.

मनसेकडून मागणी केल्यावर पालिके कडून कार्यवाही देखील झाली.परंतु चौथऱ्यावर कुलर बसवावे.याप्रकारची मागणी असताना चौथरा बनवला.पण त्यावर कुलरची व्यवस्था न करता विटा व सिमेंटचे साहित्य वापरून पाण्याची टाकी बनविली व त्याला नळ जोडून नागरिकांना पिण्याचे पाणी देण्याची कार्यवाही केली.यामुळे तापत्या उन्हात पाणी गरम पिण्यास मिळत आहे.तसेच पाण्याच्या टाकीची स्वछता नसल्याने नागरिकांना अस्वच्छ, गढूळ पाणी मिळत आहे.यामुळे नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न देखील निर्माण होत असल्याचे मनसेचे म्हणणे आहे.

कोट
पाणीपोई साठी जो खर्च करण्यात आला आहे.तो खर्च अधिकाऱ्यांच्या हितासाठी करण्यात आला आहे.हा पाणी अधिकारी पीतील का?मनपाच्या प्रत्येक कार्यालयात कुलर तर करदात्याना अशुद्ध व गरम पाणी असा दुजाभाव मनसे सहन करणार नाही.म्हणून नागरीकांना थंड पाण्यावी व्यवस्था पालिकेने करून द्यावी.अन्यथा मनसे तीव्र आंदोलन उभारले व याची जबाबदारी पालिकेची असेल. 
- संदीप गलगुडे,शहर संघटक,मनसे,नवी मुंबई.

कोट
मनसेच्या मागणी संदर्भात अभियांत्रिकी विभागाला कळविले जाईल. तसेच योग्य कार्यावही करण्याच्या सूचना दिल्या जातील.
- महेंद्रसिंग ठोके,सहाय्यक आयुक्त,पालिका.


 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

देशाच्या प्रगतीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची नितांत आवश्यकता - राजरत्न आंबेडकर