आय टी सबंधित कागदपत्र वेळेवर न दिल्याचे कारण देवून लाभार्थी निवारा योजनेअंतर्गत वंचित
नवी मुंबई-: सिडको वसाहतीत लाभार्थी माथाडी कामगारांना राखीव कोट्यातील घरे लागली आहेत. मात्र यातील गणेश माने या कामगाराने आय टी कागदपत्रे वेळेवर सादर न केल्याने त्यास सिडकोने घरापासून वंचित ठेवले आहे. त्यामुळे या माथाडी कामगाराला लवकरात लवकर घरे द्यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक आणि जनरल मॅनेजर फैयाज खान यांचेकडे केली आहे
सिडकोने माथाडी कामगार वर्गातील आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गातील घटकांना घरे विक्री केली होती.मात्र पणन विभागातील अधिकाऱ्यांनी या लाभार्थी वर्गाला उपेक्षित ठेवत घराच्या हक्कापासून वंचित ठेवले आहे.केवळ आय टी सबंधित कागदपत्र वेळेवर दिले नसल्याचे कारण देवून तत्कालीन पणन व्यवस्थापकांनी घणसोली येथील लाभार्थी निवारा योजनेअंतर्गत वंचित ठेवण्यात आले आहे. माथाडी कामगार गणेश विलास माने यांना इरादा पत्र दिल्यानंतर आय टी कागदपत्र सादर करण्याची संधी न देता या लाभार्थी व्यक्तीला घरापासून वंचित ठेवले आहे.एल आय जी प्रकारातील घराचे पत्र १२/१०/२०१८ रोजी दिल्यानंतर या लाभार्थी व्यक्तीला सिडकोचे खेटे घालण्याची नामुष्की ओढवली आहे.त्यामुळे सदर व्यक्तीला न्याय द्यावा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करावे लागेल याची नोंद घ्यावी. असा इशारा शिंदे यांनी दिला आहे.यावेळी माथाडी कामगार गणेश माने, त्यांच्या पत्नी रश्मी माने व मनसे सहकार सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.