नालेसफाई दरम्यान कामगारांच्या जीवाशी खेळ ?

नवी मुंबई-: नवी मुंबई शहरात १५ मे पर्यत मान्सून पूर्व नाले सफाईची मनपा आयुक्तांनी अंतिम मुदत दिल्याने नालेसफाईच्या कामांनी वेग धरला आहे. मात्र सदर नाले सफाई करत असताना ठेकेदारांमार्फत कामगारांना कुठल्याही प्रकारची सुरक्षात्मक साधने न देताच साफसफाई करवुन घेत या कामगारांच्या जीवाशी खेळ मांडल्याचे चित्र सध्या नवी मुंबई शहरात दिसत आहे.

शहरात पावसाचे पाणी साचून पुर सदृश परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून नवी मुंबई महानगरपालीकेकडून दरवर्षी मान्सून पुर्व नालेसफाईची कामे केली जातात. ही कामे विविध कंत्राटदारांना देण्यात येतात. मात्र नालेसफाईचे कंत्राट देताना काही अटी, नियम आखून देण्यात आलेले असताना, यामध्ये सफाई कामगारांना मास्क, गमबूट, हातमोजे तसेच गरज पडल्यास ऑक्सिजन सिलिंडरही अशी सुरक्षात्मक साधने देण्याचा समावेश असतो. यंदा ही मनपा आयुक्तांनी नालेसफाईसाठी १५ मे ची अंतिम मुदत दिली असून शहरात नालेसफाईने जोर पकडला आहे. मात्र शहरात आजमितीस सुरू असलेल्या नालेसफाईत ठेकेदाराचीच हातसफाई होत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. गाळाने भरलेल्या नाल्यात सफाई कामगार सुरक्षा साधनांविनाच उतरत असल्याने ठेकेदारांनी कामगारांच्या आरोग्याशी खेळ  मांडला आहे. त्यामुळे कामगारांच्या सुरक्षेत हलगर्जी केल्यास एखादा प्रसंग कामगारांच्या जीवावरही बेतू शकतो. मात्र तरीही सफाई कामगारांना कुठलीही साधने पुरवली गेली नसल्याने सुरक्षात्मक साधनांविनाच कामगारांकडुन काम करवून घेत कामगारांच्या जीविताशी दरवर्षीप्रमाणे खेळच सुरू आहे चित्र सध्या नवी मुंबई शहरात दिसत आहे.

त्यामुळे  नालेसफाई दरम्यान एखादा अपघात घडल्यास त्याची जबाबदारी कुणी घ्यायची? असा सवालही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

भेंडखळ  खाडीत सोडण्यात येणाऱ्या दूषित पाण्यामुळे, हजारो मासे मृत्युमुखी ; प्रशासनाचे दुर्लक्ष