अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी 30 एप्रिल 2022 पर्यंत शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

             ठाणे : अनुसूचित जात प्रवर्गातील नवीन अर्ज भरणाऱ्या विद्यार्थांनी शिष्यवृत्तीसाठी 30 एप्रिल 2022 पर्यंत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत. तसेच सन 2020-21 व 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी महाविद्यालयांनी सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठीचे विद्यार्थ्यांचे अर्ज महाडीबीटी (MAHADBT) पोर्टलवर नोंदणी व तपासणी करुन समाज कल्याण विभागाच्या ठाणे सहायक आयुक्त कार्यालयाकडे यांच्याकडे सादर करावेतअसे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त बलभीम शिंदे यांनी केले आहे.

            शासनाचे सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी (MAHADBT) पोर्टल दिनांक 14 ऑगस्ट 2021  पासून कार्यन्वित झाले असून विद्यार्थ्यांनी http://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावेत. तसेच महाविद्यालयानी सदर अर्ज तपासून व पडताळणी करून सहायक आयुक्तसमाज कल्याणठाणे यांच्याकडे मान्यतेस्तव सादर करावेत. महाविद्यालयाकडून प्राप्त झालेल्या अर्जाची पडताळणी केल्यानंतर समाज कल्याण विभागामार्फत ऑनलाईन मान्यता देण्यात येईल.

            तपासणी केलेले अर्ज विहीत कालावधीत महाविद्यालयाकडून प्राप्त न झाल्यास व मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महाविद्यालयाचे प्राचार्य व संबंधित संस्थेची राहीलअसे आवाहन सहायक आयुक्त शिंदे यांनी केले आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नालेसफाई दरम्यान कामगारांच्या जीवाशी खेळ ?