खारघर: जागतिक आरोग्य दिनानिमित्त केंद्र शासनाच्या वतीने "स्पेशल ओलंपिक भारत "या उपक्रमांतर्गत देशातील 75 शहरातील बौद्धिक अपंगत्व असलेल्या 75 हजार क्रिडापटूंची तपासणी करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.या उपक्रमांतर्गत डि. वाय. पाटील दंत महाविद्यालयाच्या वतीने सीबीडी बेलापूर येथील मंगल सभागृह 308 बौद्धिक (दिव्यांगजन) असलेल्या खेळाडूंची तपासणी करण्यात आली.
भारत सरकारच्या ‘आझादी का अमृत महोत्सव’ उपक्रमाअंतर्गत जागतिक आरोग्य दिनानिमित्त सुरू करण्यात आलेल्या ‘स्पेशल ऑलिम्पिक भारत’ने बौद्धिक अपंगत्व असलेल्या खेळाडूसाठी राष्ट्रीय आरोग्य महोत्सवाची सुरुवात करण्यात आली होती. त्यासाठी राज्यात मुंबई, पुणे, ठाणे, कोल्हापूर, लातूर, रायगड, रत्नागिरी आणि नवी मुंबई अश्या बारा ठिकाणी तीन हजार दिव्यांगजन खेळाडूची तपासणी शिबिर केंद्राची निवड करण्यात आली होती. त्यापैकी डी. वाय. पाटील दंत महाविद्यलयात 308 खेळाडूची मोफत तपासणी करण्यात आली. या उपक्रमासाठी शिक्षक, पालक तसेच दिव्यांग खेळाडू मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. हा स्तुत्य उपक्रम यशस्वी होण्यासाठी डि. वाय. पाटील युनिव्हर्सिटी स्कुल ऑफ दंत चिकित्साचे शिक्षक, कर्मचारी, पदव्युत्तर विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.