हार्मोनि शाळेत वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
खारघर : खारघर मधील हार्मोनि शाळेत हार्मोनिका चार हा वार्षिक सांस्कृतिक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.या वेळी संगीत शिक्षक कृष्णन पोटी आणि सहकाऱ्यांनी विविध राज्यातील सांस्कृतिक संगीत तसेच विविध देवदेवतांच्या ओवी सादर केल्याने रसिक मंत्रमुग्ध झाले. या सांस्कृतिक सोहळ्याचे उद्घाटन खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिपान शिंदे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी शाळेचे संचालक तसेच प्राचार्य मीना थंबी ,शिक्षक आणि पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या वेळी शाळेने आगळ्यावेगळ्या सांस्कृतिक उपक्रम घेवून सर्व पालकांना सहभागी करून घेतल्याने समाधान वाटत असल्याचे पालकांनी सांगितले.