केंद्रीय पथकांची पाठ फिरतातच फेरीवाल्यांचे पुन्हा बस्तान
नवी मुंबई-:स्वव्ह सर्वेक्षण स्पर्धे अनुषंगाने शहरात केंद्रीय पथकांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान मनपा अतिक्रमण विभागामार्फत फेरीवाल्यांवर कारवाई करून शहर स्वच्छतेचा दिखावा उभा करण्यात आला. मात्र केंद्रीय पथकांची पाठ फिरताच अतिक्रमण विभागाच्या आशीर्वादाने आशा फेरीवाल्यांनी पुन्हा डोकं वर काढल्याचे एपीएमसी फळ मार्केट बाहेरील फेरिवाल्यांनी मांडलेल्या बस्तानावरून दिसुज येत आहे.
स्वच्छ सर्वेक्षण दरम्यान नवी महानगर पालीकेच्या वतीने शहर भर स्वच्छ तेचा जागर करत शहराला साफ ठेवण्याचा प्रयत्न केला।जातो.आणि या स्पर्धेसाठी केंद्रीय पथके शहरात पाहणी करून स्पर्धेतील गुण ठरवतात आणि त्यावर शहराचे नामांकन ठरते.त्यामुळे केंद्रीय पथकांच्या पाहणी दौऱ्या वेळ मनपा अधिकरो पहाटे सहा वाजल्यापासुन कामावर हजर असतात.याच दरम्यान स्वच्छतेच बाधा ठरत असलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांवर व्यापक प्रमाणात कारवाई करुन मनपा अधिकारी स्वच्छतेचा दिखावा उभा करतात. मात्र केंद्रीय पथकांची पाठ फिरतात अतिक्रमण विभागाच्या आशीर्वादाने आशा फेरीवाल्यांनी पुन्हा डोकं वर काढल्याचे एपीएमसी फळ मार्केट बाहेरील फेरिवाल्यांनी मांडलेल्या बस्तानावरून दिसुज येत आहे. एपीएमसी फळ मार्केट बाहेरील पदपथावर खाद्य पदार्थ बनवणाऱ्यांनवर मनपा अतिक्रमण विभागामार्फत अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जात असल्याने या ठिकाणी अशा फेरीवाल्यांचे बस्तान वाढले आहे.त्यामुळे ठिकाणी पादचाऱ्यांना वाट काढणे मुश्कील होऊन बसले आहे.अशा फेरीवाल्यांवर कायम स्वरूपी कारवाई करण्याची मगणी जात धरू लागली आहे.