खारघर: देशात महागाई तसेच गॅस सिलेंडरचे दर मोठ्या प्रमाणात वाढली, बेरोजगारी वाढली आहे. एक वर्षांपूर्वी कोरोना काळात बेड, ऑक्सिजन तसेच हॉस्पिटल उपलब्ध नव्हते, परंतू आज कोणी भोंगे तसेच, हिंदू, मुस्लिम या विषयावर बोलून अशांतता निर्माण करण्याचे काम सुरु असून हे योग्य नसल्याचे महिला बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी खारघर मध्ये सांगितले.
कै सतीश हावरे यांच्या स्मरणार्थ खारघर मध्ये श्री गाडगे महाराज धर्मशाळेचे शुभारंभच्या कार्यक्रमासाठी खारघरमध्ये आल्या होत्या त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी वरील उत्तर दिले. गाडगे महाराज यांनी स्वच्छतेसाठी आयुष्य वेचले, कॅन्सर आजार असलेल्या रुग्णास उपचार मिळत नाही. त्यांच्या प्रेरणा घेवून कॅन्सर रुग्णांसाठी हावरे इंजिनिअर्स अँड बिल्डरच्या संचालिका उज्वला हावरे यांनी कॅन्सर रुग्णसाठी साठ बेडचे आश्रम उपलब्ध करून दिले आहे. गाडगे बाबाचे पालन नागरिकांनी करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले, वातावरण बिघडवणारे हिंदू आणि आम्ही काय आकाशातून मधून टपकलो आहोत का असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर,उज्वला हावरे, प्रवीण हावरे, श्री गाडगे बाबा मिशनचे कार्याध्यक्ष मधुसूदन मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते. ठाकूर या काँग्रेस पक्षाच्या आमदार मंत्री आहेत. मात्र खारघर मध्ये यावेळी काँग्रेसचे एकही पदाधिकारी आणि काँग्रेस दिसून आले नाही. त्यामुळे खारघर मध्ये काँग्रेस आहेत कि नाही अशीही चर्चा नागरिकांमध्ये सुरु होती.