चिरनेर येथील महावितरणाचे कार्यालय पून्हा सूरु
उरण : काही दिवसांपूर्वी महावितरणाकडे कार्यालय भाडे देण्यास पैसे नसल्याने चिरनेर महावितरण कार्यालय बोकडविरा येथे हलविले होते.परंतू त्यावेळी तत्काळ शिवसेना उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर यांनी महावितरणाला पत्रव्यवहार करुन आंदोलनाचा ईशारा दिला. त्यांच्या या पवित्र्यामूळे पुन्हा महावितरणाचे कार्यालय चिरनेर येथे सूरु करण्यात आले.त्यामूळे चिरनेर परीसरातील जनतेने संतोष ठाकूर यांचे आभार मानले.
कार्यालय भाडे देण्यास पैसे नसल्याचे कारण पूढे करत महावितरणाच्या उरण उपविभागाने चिरनेर येथील सूमारे 50 वर्षाहून जास्त काळ चिरनेर येथे आसलेले कार्यालय बोकडविरा येथील सिडकोच्या जागेत हलविले होते.त्यामुळे चिरनेर परिसरातील जनतेचा पैसा आणि वेळ वाया जाणार असल्याने जनतेत संतापाची लाट उसळली होती. भरमसाठ विज बिले आकारणारे उरण महावितरण कंगाल झाले आसल्याच्या भावना देखील जनतेने व्यक्त केल्या गेल्या होत्या.
हि गोष्ट उरण तालुका शिवसेना तालुका प्रमुख संतोष ठाकूर यांना समजताच त्यांनी उरण उपविभागाचे उपअभियंता विलास सोनवणे यांची भेट घेतली व महावितरणाला लेखी पत्र देवून आंदोलनाचा इशारा दिला होता.तसेच महावितरण कार्यालयातील अभियंता हा चूकिचा निर्णय घेवून आपला मनमानीपणा चालवत असतील तर ते या परिसरातील नागरिक सहन करणार नाहीत.त्यामूळे कार्यालय चिरनेर येथे पून्हा परत चालू करावे आशी विनंती वजा समज ही त्यांनी दिली होती.त्यांच्या आक्रमक पवित्र्याला यश मिळाले आसून आठवड्याभरात कार्यालय चिरनेर येथे पून्हा सूरु करण्यात आले.