येत्या खरीप हंगामात खत व बियाणांच्या विक्री व वितरणाच्या तक्रार निवारणासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करावा - उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे

ठाणेयेत्या सन 2022-23 च्या खरीप हंगामात खतांची  बियाणांची विक्री  वितरणासंदर्भातील तक्रारींचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करावीतसेच खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना खते, बि-बियाणे याबद्दल कोणतीही अडचण येणार नाही, याकडे लक्ष देण्याचे निर्देश उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) गोपीनाथ ठोंबरे यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत  ठोंबरे बोलत होते. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ, इफ्कोच्या संचालक साधना जाधव, दिपक कुंटे, अर्चना आखाडे, विजय तुपसौंदर्य, बी.जावीर, सुनिल शेलवले, अलका करडे, सारिका शेलार, तात्यासाहेब कोळेकर, समीर ठाकरे आदी उपस्थित होते. खरीप हंगामासाठी जिल्हा कृषि विभागाने केलेल्या तयारीचा आढावा यावेळी घेण्यात आला. खरीप हंगामात येणाऱ्या अडचणी, खते, बियाणे यांचे नियोजन, खतांचा शिल्लक साठा, युरियाचा वापर, आपले सरकार पोर्टलवर करावयाची नोंदणी, कृषि ॲप वापर आदी विविध विषयांवर यावेळी चर्चा झाली.

सन 2022-23 या वर्षातील खरीप हंगामात जिल्ह्यातील एकूण लागवड योग्य 59 हजार 723 हेक्टर पड क्षेत्रापैकी नागली पिकाच्या लागवडीसाठी 5000 हेक्टर व वरी पिकाच्या लागवडीसाठी 2500 हेक्टर क्षेत्र लागवडीसाठी आणण्याचे नियोजन कृषि विभागाने केले आहे. सन 2022-23 मध्ये ठाणे जिल्ह्यातील 56 हजार हेक्टर भात पिक, नागलीसाठी 7081.65 हेक्टर, इतर तृणधान्यासाठी 3835.50 हे. उडीदसाठी 200 हे. मूगसाठी 100 हे. तूर 10 हजार हेक्टर, इतर कडधान्य पिके 50 हेक्टर व गळीत धान्य 100 हेक्टरवर लागवड करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. हंगामी खरीप हंगामात युरिया व डीएपी खताचा साठा संरक्षित करून तालुका स्तरावर कृषी सेवा केंद्रांना उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. खतांचा काळाबाजार, जादा दराने विक्री, साठेबाजी, बोगस खतांची विक्री व वितरणावर संनियंत्रण ठेवणे यासाठी कृषी विभागाने जिल्हा स्तरावर एक व तालुकास्तरावर प्रत्येकी एक अशी एकूण सहा भरारी पथके स्थापन केली आहेत, अशी माहिती  वाघ यांनी यावेळी दिली.

यावेळी उपजिल्हाधिकारी ठोंबरे यांनी जिल्ह्यातील खरीप हंगामपूर्व तयारीचा आढावा घेऊन सांगितले की, जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या योजना पोहचल्या पाहिजेत. कोणताही शेतकरी या योजनांपासून वंचित राहता कामा नये. तसेच खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणी येणार नाहीत, याविषयी कृषी विभागाने सतर्क रहावे.

            जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांनी जिल्ह्यातील खरीप हंगामात करावयाच्या उपाययोजनांची तसेच कृषि विभागाच्या विविध योजनानिहाय माहिती दिली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एपीएमसी बाजारात वाचनालय सुरू