एपीएमसी बाजारात वाचनालय सुरू
नवी मुंबई -: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाला बाजारात अग्रहरी समाज विकास सेवा संस्था आणि स्वर्गिय हिरालालशेठ बडकु गुप्ता यांच्या स्मरणार्थ गुप्ता परिवार व अग्रहरी समाज यांसकडुन अद्यावत ॲक्वा फिल्टर (पाणपोई) चे नुतनीकरण व वाचनालय सुरू करण्यात आले आहे.
एपीएमसी बाजारात कामाच्या गर्देत बाजार आवारातील घटकांना पुस्तक वाचन करता यावे, वाचन संस्कृतीला जोपासण्यासाठी हे मोफत वाचनालय सुरू करण्यात आले आहे. यामध्ये विविध प्रकारचे ३००-३५० पुस्तके उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत . तसेच वर्तमान पत्र ही ठेवण्यात आले आहेत. यावेळी खासदार राजन विचारे, आमदार शशिकांत शिंदे आणि भाजीपाला बाजार समिती संचालक शंकर पिंळगे हर यावेळी उपस्थित होते.