उरण आगारातील बस सेवा  नव्वद टक्के पूर्ववत

उरण : मुंबई विभागाच्या उरण आगारात संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचे पुनरागमन झाले आहे. आगारातील १९३  कर्मचाऱ्यांपैकी जवळजवळ 181 कर्मचारी पून्हा कामावर रुजू झाले आहेत. त्यामूळे ९०  टक्क्यांहून अधिक बस सेवा सुरू झाली असल्याची माहिती उरण एस. टी. डेपोचे डेपो मॅनेजर सतीश मालचे यांनी दिली आहे.

जवळजवळ ऑक्टोबर महिन्यापासून राज्यातील एस. टी. कर्मचारी संपावर गेले होते. उरण बस डेपोतील  कर्मचारी नोव्हेंबर पासून संपावर गेले होते. संपामूळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले व नाहक आर्थीक भूदंड प्रवाशांना सोसावा लागला होता. त्याचबरोबर महामंडळाचे देखील प्रचंड आर्थीक नुकसान झाले होते. अनेक चढ उतार झाल्यानंतर शासनाने संपकरी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्यासाठी असलेली वाहतूक सेवा शेवटचा ईशारा दिल्यानंतर एसटी कर्मचारी कामावर हजर होवू महिन्याच्या नंतर वाहक व लागले. त्या अनुशंगाने उरण एसटी डेपोतील संपामध्ये सहभागी झालेले उरण एस. टी. आगारातील जवळ जवळ181   कर्मचारी पुन्हा कामावर हजर झाले आहेत.

जे कर्मचारी हजर आहेत त्या सर्व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून,  वाहक व चालकांना पुन्हा प्रशिक्षण देण्यास सुरवात केली आहे.  सहा चालकांचे प्राथमिक प्रशिक्षण संपल्यावर या महिन्या अखेर बस सेवा १०० टक्के पूर्ववत करण्यात येईल. अशी माहिती उरण एस. टी. डेपोचे डेपो मॅनेजर सतीश मालचे यांनी दिली आहे. चालू असलेल्या वाहतूक सेवे अंतर्गत उरण आगारातून  ३८ पैकी 34 गाड्या  सोडण्यात येत आहेत . त्यामध्ये दादर, ठाणे, वाशी, पनवेल, अलिबाग, शिर्डी , मालेगाव , ठाणे, पेण, आदी ठिकाणी  बस  सेवा सुरू करण्यात आली आहे.तसेच उरण मधील ग्रामीण लवकरच बस सेवा सुरु करण्यात येईल अशीही माहिती उरण आगार व्यवस्थापक सतीश मालचे यांनी दिली ,

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अनधिकृत  शाळांची यादी जाहीर करण्यास विलंब