एकविरा महिला मंडळाच्या वतीने हळदी कुंकू समारंभाचे आयोजन
नवी मुंबई-: एकविरा महिला मंडळ कोपरी व धनश्री केशव ठाकूर केशव महादू ठाकूर यांच्या माध्यमातून कोपरी गावात बुधवार दिनांक २० एप्रिल रोजी भव्य हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हास्य प्रबोधनकार संजीवन म्हात्रे ,कोपरी गाव ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष परशुराम महादु ठाकूर माजी नगरसेविका उषाताई पुरूषोत्तम भोईर समाजसेविका , अनिता परशुराम ठाकूर, सुनिता सुरेश ठाकूर, उषा विलास भोईर, सुमित्रा मोरेश्वर ठाकूर, विजया नकुल भोईर, संगीता पाटील, कोमल अक्षय ठाकुर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी स्थानिक कलाकारांनी नृत्य कार्यक्रमात भाग घेत आपली कला सादर केली तसेच उपस्थित महिलांसाठी पाच प्रकारात लकी ड्रॉ पध्दतिने पैठणी साड्या ठेवण्यात आल्या होत्या .